सिनेमात वापरल्या जाणाऱ्या फॅन्सी कपड्यांचे शूटिंग नंतर काय करतात? जाणून घ्या
Bollywood Iconic Dresses (Photo Credits: Instagram)

हम आपके है कौन (Hum Aapke Hai Koun) मधल्या माधुरीची (Madhuri Dixit) साडी असो वा अनारकलीचे ड्रेस,कॉकटेल मध्ये दीपिकाचे (Deepika Padukone) हॉट स्टायलिश कपडे ते बाजीराव मस्तानी मधली वेल्व्हेट पैठणी, बॉलिवूडच्या सिनेमांमध्ये करणयात येणारी फॅशन नेहमीच प्रत्येकाला भुरळ पाडते. नेहमीच लार्जर दॅन लाईफ असं जग निर्माण करणाऱ्या या आभासी जगातील हिरो हिरोईनचे कपडे आणि त्याची किंमत अनेकदा चर्चेचा विषय असतो. एका छोट्या शॉट साठी सुद्धा दिवसांची मेहनत घेऊन बनवला जाणारा लूक हा कित्येकदा लाखो कोटींच्या घरात महाग असतो. पण मग हा शॉट झाला कि मग या कपड्यांचे काय होते हे तुम्हाला माहितीये का? यशराज फिल्मसची फॅशन स्टायलिस्ट आयशा खन्ना (aayesha Khanna) हिने मिड डे ला दिलेल्या मुलाखतीत या प्रश्नाचे उत्तर दिले.

चित्रपटात वापरण्यात येणारे कपडे बऱ्याच वेळा सांभाळून ठेवण्यात येतात आणि त्यावर त्या चित्रपटाचा टॅग लावण्यात येतो.काही खास वेशभूषा कलाकार चित्रपटाची आठवण म्हणून स्वत:कडे ठेवतात. अगदीच एक्सक्लुसिव्ह डिझाईन असल्यास हेच कपडे चाहत्यांकडून विकत देखील घेतले जातात. तर काही कपडे हे पूढे मागे त्याच प्रोडक्शन हाऊसच्या दुसऱ्या चित्रपटासाठी देखील वापरले जातात. हे कपडे काही वेळेस ज्यूनिअर आर्टिस्टसाठी वापरण्यात येतात.

प्रेक्षकांना तो ड्रेस पुन्हा वापरला आहे हे कळणार नाही याची खात्री घेण्यासाठी त्यात आवर्जून मॉडिफिकेशन करण्यात येतात. बऱ्याच वेळा हाय प्रोफाइल सेलिब्रिटी डिझायनर एखाद्या चित्रपटासाठी आपले कपडे देतात. पण चित्रपटाचे चित्रीकरण झाल्यानंतर ते कपडे परत घेऊन जातात. ‘देवदास’ आणि ‘बॉम्बे वेलवेट’ चित्रपटांच्या चित्रीकरणादरम्यान झाले आहे. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोनचे पार्टीवेअर कपडे 2 डिसेंबरला विक्रीसाठी होणार उपलब्ध

दुसरीकडे या कपड्यांचा अनेकदा लिलाव देखील केला जातो. ‘रोबोट’ चित्रपटातील ऐश्वर्या राय बच्चन आणि दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या कपड्यांचा लिलाव करण्यात आला होता आणि या लिलावामधून मिळालेले पैसे एका स्वयंसेवी संस्थेला दान करण्यात आले होते, असेही आयशा यांनी सांगितले.