Deepika Padukone (Photo Credits: Instagram)

अभिनेत्री दीपिका पादुकोन प्रत्येक महिन्याला तिचे काही निवडक कपडे, अॅक्सेसरीज् विक्रीस काढत असते. दीपिकाच्या या उपक्रमामुळे तिच्या चाहत्यांनी तिचे कौतुक केलं आहे. दीपिका या वस्तूंच्या विक्रीतून येणारे पैसे तिच्या स्वयंसेवी संस्थेसाठी दान करत असते. डिसेंबर महिन्यात दीपिका चाहत्यांसाठी तिचं खास पार्टीवेअर कलेक्शन आणणार आहे. यामध्ये जॅकेट, ब्लॅक जम्पसूट, मेटॅलिक बेल्ट, ऑरेंज गाऊन, आणि एका प्रसिद्ध चॅटशोमध्ये परिधान केलेल्या पँटचाही समावेश आहे. येत्या 2 डिसेंबरला दीपिकाच्या वेबसाईटवर हे कपडे उपलब्ध होणार आहेत. दीपिकाने ऑक्टोबर महिन्यात तिचे काही कपडे ऑनलाइन विक्रीसाठी आणले होते. तिच्या उपक्रमाला चाहत्यांनी उत्कृष्ठ प्रतिसाद दिला आहे. (हेही वाचा - 'मर्दानी 2' चित्रपटाच्या शूटींगसाठी 41 व्या वर्षी राणी मुखर्जीने घेतले स्विमिंगचे प्रशिक्षण!)

दीपिकाने काही दिवसांपूर्वी 'द लिव, लव, लाफ फाउंडेशन'ची स्थापना केली होती. या संस्थेच्या माध्यमातून मानसिक आरोग्याविषयी जनजागृती करण्यात येते. तसेच नैराश्येच्या गर्तेत अडकलेल्या अनेकांना त्यातून बाहेर येण्यासाठी मदतीचा हात दिला जातो. या संस्थेला आर्थिक मदत व्हावी यासाठी दीपिका आपल्या कपड्यांच्या विक्रीतून निधी गोळा करत आहेत. या उपक्रमाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

#jiomamimumbaifilmfestival

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

दीपिका प्रत्येक महिन्याला तिचे काही खास कपडे, ज्वेलरी, अॅक्सेसरीज आपल्या वेबसाईटवर विक्रीसाठी ठेवत असते. ग्राहकांना दीपिकाच्या या खासगी वेबसाईटच्या माध्यमातून तिचे कपडे विकत घेता येणार आहेत.