
अभिनेत्री राणी मुखर्जी (Rani Mukerji) सध्या 'मर्दानी 2' (Mardaani 2) चित्रपटामुळे चर्चेत आहे. राणीने या चित्रपटात अनेक साहसी सीन केले आहेत. परंतु, आता राणी या चित्रपटातील एका खास सीनमुळे अधिक चर्चेत आली आहे. राणी मुखर्जीला लहानपणापासून पाण्याची अत्यंत भीती वाटते. मात्र, तिने या चित्रपटासाठी वयाच्या 41 व्या वर्षी पाण्याखाली शूटींग केलं आहे. मर्दानी चित्रपटात राणीला 30 फुट खोल पाण्याखाली एका सीनचं शूटींग करायचं होतं. परंतु, राणीला लहानपणापासून पाण्याची भीती वाटते. त्यामुळे ती हा सीन करण्यासाठी तयार होत नव्हती. मात्र राणीला तिच्या सहकार्यांनी समजवल्यानतंर ती या सीनसाठी तयार झाली. (हेही वाचा - Mardaani 2 Official Trailer: सत्य घटनेवर आधारित असा अंगावर काटा आणणारा 'मर्दानी 2' चित्रपटाचा ट्रेलर, Watch Video)
दरम्यान, राणी मुखर्जीने सांगितले की, दिग्दर्शकांनी मला पाण्याखालील सीन विषयी सांगितलं, त्यावेळी मी खूप घाबरली होती. कारण, मला लहानपणापासून पाण्याची भीती वाटते. मी दिग्दर्शकाला तो सीन काढून टाकण्याची विनंती केली. परंतु, त्यांनी माझं ऐकल नाही. शेवटी मी मोठ्या धाडसाने पोहण्याचं प्रशिक्षण घेतलं आणि पाण्याखालील सीन शूट केला, असंही राणीने सांगितलं.
हेही वाचा - दिशा पटानी चा बिकिनीतील हा हॉट लूक पाहून तुम्हीही व्हाल घायाळ; सेक्सी अंदाज सोशल मिडियावर व्हायरल
'मर्दानी 2' चित्रपटासाठी राणीने प्रचंड मेहनत घेतली आहे. 'मर्दानी 2' हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेली दृश्ये अंगावर काटा आणणारी आहेत. तसेच राणी मुखर्जीचा यातील अभिनयही पोलीसाच्या व्यक्तिमत्वाची छाप पाडणारा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन गोपी पुराथन यांनी केलं आहे. तरआदित्य चोप्रा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.