Mardaani 2 Official Trailer: सत्य घटनेवर आधारित असा अंगावर काटा आणणारा 'मर्दानी 2' चित्रपटाचा ट्रेलर, Watch Video
Mardaani 2 Trailer (Photo Credits: YouTube)

2014 साली प्रदर्शित झालेला 'मर्दानी' हा हिंदी चित्रपट त्याच्या कथेमुळे आणि विशेष करुन अभिनेत्री राणी मुखर्जी हिच्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांची मने जिंकली होती. तेव्हापासून या चित्रपटाच्या पुढच्या पार्टची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती. मात्र राणी मुखर्जी (Rani Mukherjee) आई झाल्याने तिने काही काळ ब्रेक घेतला होता. त्यामुळे हा चित्रपट थोडा लांबणीवर पडला होता. मात्र एप्रिल मध्ये 'मर्दानी 2' (Mardaani 2) या चित्रपटाचा फर्स्ट लूक पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या आणि मग सर्वांना आतुरता लागलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये राणी पोलीस वर्दीत दिसल्याने तिचा थोडा वेगळा लूक आणि वेगळा अंदाज पोलिसांना पाहायला मिळेल.

'मर्दानी 2' हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेली दृश्ये अंगावर काटा आणणारी आहेत. तसेच राणी मुखर्जीचा यातील अभिनयही पोलीसाच्या व्यक्तिमत्वाची छाप पाडणारा आहे. Watch Video

हेदेखील वाचा- Mardaani 2 First Look: अभिनेत्री राणी मुखर्जी हिचा मर्दानी 2 चित्रपटातील पोलीस वर्दीतील लूक प्रेक्षकांच्या भेटीला

गोपी पुराथन दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती आदित्य चोप्रा यांनी केली आहे. या चित्रपटातील खलनायक मात्र ट्रेलरमध्ये दाखवला नाही मात्र त्याचा आवाज कळतोय. त्यामुळे हा खलनायक नक्की कोण असेल याबाबतही प्रेक्षकांची उत्सुकता वाढलीय.

आई झाल्यानंतर राणीने 'हिचकी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले होते. मात्र तो चित्रपट फारसा चालला नाही. मात्र या सिनेमाकडून राणीला आणि तिच्या चाहत्यांनाही ब-याच अपेक्षा आहेत. येत्या 13 डिसेंबरला हा चित्रपट आपल्या भेटीला येत आहे.