 
                                                                 Paatal Lok Trailer: सस्पेंसने भरलेल्या ‘पाताल लोक’ (Paatal Lok) वेब सीरिजचा (Web Series) ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) पाताल लोक वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या वेब सीरिजची निर्मिती अनुष्काने केली आहे. या वेब सीरिजमध्ये खोट्या बातम्या, भ्रष्टाचार, हिंसाचार, स्त्रियांवर होणारे अत्याचार, धार्मिक भेद अशा विषयांवर भाष्य करण्यात आलं आहे.
दरम्यान, आतापर्यंत ‘पाताल लोक’ या वेब सीरिजचा ट्रेलर अनेकांनी पाहिला असून आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. प्रेक्षकांना ही वेब सीरिज अॅमेझॉन प्राईमवर येत्या 15 मे पासून पाहता येणार आहे. (हेही वाचा - बॉलिवुड अभिनेता विकी कौशल ने सांगितली पाणीपुरी खाण्याची खरी पद्धत; पहा व्हायरल व्हिडिओ)
Irrfan Khan ला आर्टिस्ट ने वाहिली अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली ; भिंतीवर रेखाटल इरफान च चित्र - Watch Video
या सस्पेंस आणि थ्रीलर क्राईम सीरिजमध्ये जयदीप अल्हावत, गुल पनाग, स्वास्तिका मुखर्जी यांसारखे प्रसिद्ध कलाकार महत्त्वाची भूमिका बजावताना पाहायला मिळणार आहे. पाताल लोक या वेब सीरिजची पटकथा लेखक सुदीप शर्मा यांनी लिहिली आहे. सध्या सोशल मीडियावर या वेब सीरिजचा ट्रेलर प्रचंड व्हायरल होत आहे.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
