बॉलिवुड अभिनेता विकी कौशल ने सांगितली पाणीपुरी खाण्याची खरी पद्धत; पहा व्हायरल व्हिडिओ
Vicky Kaushal (PC- Instagram)

कोरोना व्हायरसने (Coronavirus) संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. भारतात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात 17 मे पर्यंत लॉकडाऊन (Lockdown) पाळण्यात येत आहे. सध्या लॉकडाऊन काळात अनेक बॉलिवुड कलाकार घरात राहुन आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करत आहेत. अशातचं बॉलिवुड अभिनेता विकी कौशलने (Vicky Kaushal) आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात विकीने पाणीपुरी (Panipuri) खाण्याची खरी पद्धत सांगितली आहे.

विकीचा पाणीपुरी खातानाचा हा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये विकीने मुंबईमध्ये पाणीपुरी कशी खाल्ली जाते याची खरी पद्धत सांगितली आहे. लॉकडाऊन काळात विकी धम्माल करताना दिसत आहे. विकीच्या चाहत्यांनी या व्हिडिओ लाईक तसेच कमेंन्टस केल्या आहेत. (हेही वाचा - लॉकडाऊन काळात नोरा फतेही ला होतोय 'हा' त्रास; इन्स्टाग्रामवर शेअर केला व्हिडिओ)

दरम्यान, काही दिवसांपूर्वी विकी कौशल राहत असलेल्या सोसायटीमध्ये कोरोना रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर ही सोसायटी सील करण्यात आली होती. या बिल्डिंगमध्ये विकी कौशलसह चित्रांगदा सिंह, राजकुमार राव, पत्रलेखा, राहुल देव, मुग्धा गोडसे, कृष्णा अभ‍िषेक, कश्मीरा शाह, नील नितिन मुकेश, डायरेक्टर आनंद एल राय, विपुल शाह, प्रभु देवा, आदी कलाकार राहतात.