Vicky Kaushal आणि Katrina Kaif लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार? दोघांनी गुपचूप साखरपुडा उरकल्याची सोशल मीडियावर चर्चा
Vicky Kaushal, Katrina Kaif (Photo Credit: Instagram)

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. याचदरम्यान, हे दोघेही एकत्र फिरताना दिसले आहेत. मात्र, या दोघांपैकी एकानेही त्यांच्या नात्याबाबत अद्याप काहीच भाष्य केले नाही. याचपार्श्वभूमीवर विकी कौशल आणि कतरिना कैफ लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार असून त्यांनी गुपचूप साखरपुडा उकरल्याची सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. महत्वाचे म्हणजे, दोघांकडूनही या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही.

बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर असे ट्विट केले आहे की, ‘विकी कौशल आणि कतरिना कॅफने साखरपुडा केल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नसल्याचे विरल भयानीने ट्वीट केले आहे. सध्या त्याचे हे ट्वीट चर्चेत आहे. हे देखील वाचा- Riteish-Genelia Romantic Videos: रितेश आणि जेनेलिया यांचे 'हे' रोमॅंटिक व्हिडिओ तुम्ही पहिलेत का? ( Watch Video )

ट्वीट-

विरल भायनीने केलेल्या या ट्विटवर आतापर्यंत लाखो लोकांनी कमेंट केली आहे. यातील एका युजरने ही बातमी खरी असू दे, असे म्हटले आहे. तर, दुसऱ्या युजरने आता आम्ही लग्नाची वाट पाहत आहोत, असे म्हटले आहे.