Varsha Dandale Health Update: 'वच्छी आत्या'  फेम अभिनेत्री वर्षा दांदळे यांचा भीषण अपघात; चाहत्यांकडे केली 'प्रार्थना' करण्याचे भावनिक आवाहन
वर्षा दांदळे | PC: Instagram

मराठी मालिका, नाटकांमधून घराघरामध्ये पोहचलेली अभिनेत्री वर्षा दांदळे (Varsha Dandale) यांचा भीषण अपघात झाला आहे. वर्षा दांदळे यांनी इंस्टाग्राम पोस्ट करत चाहत्यांना त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याचं आवाहन केले आहे. दरम्यान वर्षा दांदळे यांना अपघातामध्ये पाठीच्या कण्याला जबर धक्का बसला आहे तर उजव्या पायाला देखील दुखापत झाल्याचं त्यांनी पोस्ट मध्ये लिहलं आहे. सोबतच त्यांनी अंथरूणाला खिळलेल्या अवस्थेतील एक फोटो देखील पोस्ट केला आहे.

वर्षा दांदळे या 'वच्छी आत्या' या भूमिकेतून खूपच लोकप्रिय झाल्या. टेलिव्हिजनवर त्यांनी नुकतेच 'पाहिले न मी तुला' या मालिकेत काम केले होते. यामध्ये त्यांनी 'वर्षा मावशी' ची भूमिका साकरली होती. 'नकटीच्या लग्नाला यायचं हं', ' घाडगे आणि सून', 'कृपा-सिंधू', एकाच या जन्मी जणू, आनंदी हे जग सारे यांसारख्या अनेक मालिकांमधील त्यांचं काम रसिकांच्या पसंतीला उतरलं आहे. मालिकांसोबत त्यांनी नाटकांमध्ये ही काम केलं आहे. 'नांदा सौख्य भरे' मालिकेत त्यांचा 'वच्छी आत्या'चा ठसकेबाज पणा रसिकांना अधिक भावला होता.  नक्की वाचा: अजिंक्य देव ते संजय नार्वेकर या 4 बड्या मराठी कलाकारांचे छोट्या पडद्यावर पुनरागम; रसिकांसाठी पर्वणी.

वर्षा दांदळे यांची पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Varsha Dandale. (@varshadandale)

वर्षा दांदळे यांच्या पोस्ट वर कलाविश्वात त्यांच्यासोबत काम केलेल्या अनेकांनी पोस्ट करत त्यांना आराम करण्याची, काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. कलाक्षेत्रात पूर्णवेळ येण्याआधी वर्षा दांदळे या मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये संगीत शिक्षिका म्हणून काम करत होत्या.