Marathi Television| PC: Twitter, Instagram

कोरोना संकटाचा फटका कलाक्षेत्राला देखील बसला आहे. सध्या कोरोना वायरसच्या दहशतीखाली लॉकडाऊन असल्याने सिनेमागृह, नाट्यगृह बंद ठेवण्यात आली आहेत. पण टेलिव्हिजन क्षेत्राने बाबो बबल आणि सुरक्षेचे नियम सांभाळत आपलं काम कोरोना वायरसच्या दुसर्‍या लाटेमध्ये सुरू ठेवलं आहे. त्यामुळे रूपेरी पडद्यावर आणि रंगभूमीवर तुम्ही अनेक कलाकारांना पाहू शकला नसलात तरीही काही या क्षेत्रातील काही नामवंत मंडळी आता रसिकांना त्यांच्या घरात टेलिव्हिजन च्या माध्यमातुन भेटायला आले आहेत. दरम्यान या कलाकारांच्या यादीमध्ये जय भवानी जय शिवाजी मालिकेमधून अजिंक्य देव (Ajinkkya Deo), निशिगंधा वाड (Nishigandha Waad) येत आहेत. तर ती परत आलीये मधून विजय कदम (Vijay Kadam) आणि तुझ्या इश्काचा नादखुळा मध्ये संजय नार्वेकर (Sanjay Narvekar) दिसणार आहेत.

अजिंक्य देव

'जय भवानी जय शिवाजी' या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिलेदारांवर आधारित मालिकेत अजिंक्य देव बाजी प्रभू देशपांडे यांची भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी अजिंक्यने शारिरिक मेहनत घेतली आहे सोबतच केसांनाही कात्री लावली आहे. Jay Bhavani Jay Shivaji Serial Song: जय भवानी जय शिवाजी मालिकेचं शिर्षकगीत प्रेक्षकांच्या भेटीला (Watch Video).

निशिगंधा वाड

 

View this post on Instagram

 

A post shared by Nishigandha Waad (@nishigandhawad)

निशिगंधा वाड देखील अनेक दिवसांनी आणि रसिकांना सुखद धक्का देणार्‍या अशा एका भूमिकेत पहायला मिळत आहेत. निशिगंधा वाड 'जय भवानी जय शिवाजी' या मालिकेत राजमाता जिजाऊ यांची भूमिका साकारत आहेत.

विजय कदम

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

मराठी रंगभूमीवरील विनोदी नाटकांचा काळ गाजवणारा अभिनेता विजय कदम आता रसिकांना टेलिव्हिजन वर देखील खिळवणार आहे. झी मराठी वरील ती परत आलीये या गूढकथेमध्ये विजय कदम यांची महत्त्वाची भूमिका आहे. Ti Parat Aaliye Promo: 'ती परत आलीये' मालिकेद्वारा विजय कदम यांचे छोट्या पडद्यावर पुनरागमन.

संजय नार्वेकर

'वास्तव' सिनेमामधून घराघरामध्ये पोहचलेले संजय नार्वेकर आता छोट्या पडद्यावरही दमदार भूमिकेतून रसिकांच्या भेटीला आले आहे. तुझ्या इश्काचा नादखुळा मालिकेत संजय नार्वेकर इंस्पेक्टर गौतम साळवी या भूमिकेतून रसिकांच्या भेटीला आले आहेत.

दरम्यान सध्या महाराष्ट्रात कोरोना स्थिती नियंत्रणात आल्याने राज्यात मालिकांचे शूटिंग पुन्हा जोमाने सुरू झाले आहे. दुसर्‍या लाटेत सार्‍या मालिकांनी राज्याबाहेर जाऊन शूटिंग सुरू ठेवत नवे एपिसोड्स दिले होते. यामुळे अनेक मालिकांमध्ये कहाणीत. लोकेशन वर बदल झाले पण रसिकांनी देखील ते स्वीकरले आहेत.