Ti Parat Aaliye Promo: 'ती परत आलीये' मालिकेद्वारा विजय कदम यांचे छोट्या पडद्यावर पुनरागमन
Ti Parat Aaliye Promo । PC: Instagram/Zee Marathi

झी मराठी वर आता 'ती परत आलीये' (Ti Parat Aaliye) या नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेचा पहिला प्रोमो नुकताच जारी करण्यात आला आहे. यामध्ये ज्येष्ठ अभिनेते विजय कदम (Vijay Kadam) दिसत आहेत. झी मराठीवर 10.30 च्या स्लॉटमध्ये ही अजून एक गुढ कथा रंगणार आहे. रात्रीस खेळ चाले, देवामाणूस, काय घडलं त्या रात्री नंतर आता अजून एक गूढकथा या वेळेत येणार असल्याने रसिकांची उत्सुकता वाढली आहे. पण सध्या 10.30 वाजता 'देवमाणूस' ही टीआरपी मध्ये बाजी मारणारी एक मालिका सुरू असल्याने नेमकं त्याचं काय होणार? हा प्रश्न देखील रसिकांना पडला आहे.

काही मीडीया रिपोर्ट्सनुसार, 'अग्गबाई सूनबाई' ही मालिका लवकरच रसिकांचा निरोप घेणार असून त्याच्याजागी काही मालिकांच्या वेळा बदलून 10.30 वाजता 'ती परत आलीये' ही मालिका दिसण्याची शक्यता आहे. लवकरच कलर्स मराठी वर देखील बिग बॉस सिझन 3 रंगणार असल्याने त्याचा फटका 'देवमाणूस'ला बसू नये म्हणून देखील हे बदल केले असावेत असा अंदाज आहे.

देवमाणूस ही मालिका एक सत्यकथेवर आधारित आहे. डॉ. अजितकुमार देव उर्फ देवीसिंह याने केलेल्या 11 खूनांच्या भोवती कोल्हापुरातील ही कथा आहे. नुकतीच या मालिकेत माधुरी पवार च्या माध्यमातून नवं पात्र रसिकांच्या भेटीला आलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

झी मराठीच्या 'ती परत आलीये' या मालिकेच्या प्रोमोतून विजय कदम अनेक दिवसांनी रसिकांना पहायला मिळाले आहेत. यापूर्वी घडलय बिघडलय मध्ये त्यांनी काम केले होते. त्यामध्ये विजय कदम विनोदी भूमिका साकारत असे. टूरटूर, सही दे सही, विछ्या माझी पुरी करा, पप्पा सांगा कुणाचे या मराठी नाटकांमधून विजय कदम यांनी अनेक विनोदी भूमिका साकारल्या आहेत.