Zee Marathi: होम मिनिस्टर आता पोहोचणार दिल्लीसोबत देशातील विविध शहरांत
Aadesh Bandekar (Photo Credits: Instagram)

आदेश बांदेकर यांचा होम मिनिस्टर शो बघता बघता इतका प्रसिद्ध झाला आहे की नुकतेच या रिऍलिटी शो ने पूर्ण केला आहे 15 वर्षांचा यशस्वी प्रवास. बांदेकर यांच्या सूत्रसंचालनाची आजवर अनेक वहिनींच्या खडतर प्रवासाला वाचा फोडण्याचं काम केलं. रोजच्या दगदगीच्या आयुष्यात आनंदाचे आणि विरंगुळ्याचे चार क्षण एखाद्या गृहिणीला मिळावे या उद्देशाने सुरु केलेला हा प्रवास महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तर पोहोचलाच. आता मात्र सर्व गृहिणींचे हे लाडके भावोजी जाणार आहेत देशाच्या कानाकोपऱ्यात.

होम मिनिस्टर या शो चं नवं पर्व 1 जानेवारीपासून झी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. हे पर्व देशभरातील विविध भाषा आणि विविध संस्कृती उलगडण्याचं काम करणार आहे. आणि विशेष म्हणजे या पर्वाचा पहिला भाग शूट होणार आहे देशाच्या राजधानी दिल्ली मध्ये. सध्या या एपिसोडचं शूट सुरु असल्याने होम मिनिस्टरची सर्व टीम दिल्लीत पोहोचली आहे.

दिल्लीच नव्हे तर वाराणसी, गुजरात, इंदौर अशा विविध भागात देखील होम मिनिस्टरचे हे विशेष भात शूट करण्यात येणार आहेत.

Exclusive: तुझ्यात जीव रंगला चे 1000 भाग पूर्ण; पाहा काय म्हणाल्या पाठकबाई म्हणजेच अभिनेत्री अक्षय देवधर 

पैठणीजी महाराष्ट्राची शान मानली जाते आता ती देशातील विविध शहरांमध्ये पोहोचणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या मराठमोळ्या संस्कृतीचा या नव्या उपक्रमातून प्रसार होईल हे मात्र नक्की.