Home Minister New Title Track: झी मराठी वाहिनीवरील सर्वात जुना रिऍलिटी शो म्हणजे आदेश बांदेकर यांचा होम मिनिस्टर. अलीकडेच या शोने 15 वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण केला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचलेला हा शो नुकताच भारत दौऱ्यावर जाऊन पोहोचला आहे. आदेश बांदेकर महाराष्ट्रातच नव्हे तर गुजरात, दिल्ली, वाराणसी सारख्या विविध भागात शूट करणार आहेत. त्यामुळे आपल्याला विविध राज्यातील संस्कृती या शोमधून सध्या पाहायला मिळत आहेत.
होम मिनिस्टर हा शो आणखी एका कारणामुळे प्रसिद्ध आहे, ते म्हणजे शोचं टायटल ट्रॅक. 'दार उघड बये दार' उघड असं म्हणत आदेश बांदेकर एंट्री घेतात आणि तिथून सुरु होतो पैठणीचा आगळावेगळा खेळ. इतके वर्ष ऐकत आलेलो हे टायटल ट्रॅक आता मात्र बदललं आहे. या गाण्याला एक ट्विस्ट देण्यात आला आहे. भारत दौऱ्यावर असणाऱ्या या गाण्याची एक झलक झी मराठी वाहिनीने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केली आहे. या व्हिडिओमध्ये आपल्याला गाण्याचं मेकिंग पाहायला मिळतं.
या नव्या गाण्यात स्वतः आदेश बांदेकर यांचा आवाज तर ऐकायला मिळतोच. पण त्यांना गायनात साथ दिली आहे जुईली जोगळेकर हिने. गाण्याचं संगीत संयोजन केलं आहे कमलेश भडकमकर यांनी.
जाणून घ्या तुमच्या लाडक्या रात्रिस खेळ चाले 2 मधील शेवंता म्हणजेच अपूर्वाच्या काही खास गोष्टी
या गाण्याचं वैशिष्ठ्य म्हणजे यात महाराष्ट्राची संस्कृती तर अधोरेखित केलीच आहे पण त्याचसोबत, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण आणि मध्य भारतातील ठिकाणांना देखील तितकेच महत्त्व देण्यात आले आहे.
होम मिनिस्टरच्या भारत दौऱ्यामुळे महाराष्ट्राची शान मानली जाणारी पैठणी साडी आता देशातील कानाकोपऱ्यात पोहोचणार आहे हे मात्र नक्की.