Happy Birthday Apurva Nemlekar: जाणून घ्या तुमच्या लाडक्या रात्रिस खेळ चाले 2 मधील शेवंता म्हणजेच अपूर्वाच्या काही खास गोष्टी
Apurva Nemlekar (Photo Credits: Instagram)

झी मराठी वाहिनीवरील रात्रिस खेळ चाले 2 शो सतत उलगडणाऱ्या नवनवीन रहस्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. या मालिकेच्या पहिल्या सीझनपेक्षा दुसरा सीझन अधिक हिट ठरत आहे तो म्हणजे अण्णा आणि शेवंताच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीमुळे. त्यातील शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपूर्व नेमळेकर हिचा आज वाढदिवस आहे. तर तिच्या या खास दिवशी जाणून घेऊया अशा काही गोष्टी ज्या प्रेक्षकांना अद्याप माहित नाहीत.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे या अभिनेत्रीने बर्‍याच टीव्ही कार्यक्रमांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. पण तिने तिच्या करियरची सुरुवात केली होती ते एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत प्रमोटर म्हणून काम करून. तिचा पहिला पगाराचा चेक हा केवळ 1000 रुपये इतकाच होता.

अपूर्वाला अभिनय क्षेत्रात करियर करण्यात कधीच रस नव्हता. तरीही तिला ऑन-स्क्रीन पाहण्याची तिच्या पालकांची इच्छा होती. तिच्या करियरशी संबंधित तिच्या मनात इतरही काही प्लॅन्स असल्याचे तिने सांगितले आहेत. पदव्युत्तर शिक्षणानंतर या अभिनेत्रीला एमबीए करायचं होतं पण आता तिचा विश्वास आहे की तिचं नशिब मनोरंजन क्षेत्रात तिला घेऊन आलं आहे.

अपूर्वा ही एक ज्वेलरी डिझायनर देखील आहे. तिच्या नावावर एक ब्रँड आहे. तिचा ब्रँड हा संपूर्ण भारतभर इमिटेशन ज्वेलरी डिझाइन आणि विक्रीचे काम बघतो.

अपूर्वाला ड्रायव्हिंग प्रचंड आवडते. ती देशभरातील बर्‍याच ठिकाणी गेली आहे आणि बहुतेक ठिकाणी ती एकटीने ड्रायव्हिंग करत गेली आहे. तसेच, जेव्हा जेव्हा ती कौटुंबिक सहलीला जाते, तेव्हा तिलाच कार ड्राइव्ह करता येणार आहे याची देखील ती खात्री करून घेते.