तुला पाहते रे मधील गायत्री दातार दिसणार एका नव्या रूपात; नक्की वाचा तिची ही Exclusive मुलाखत
Gayatri Datar (Photo Credits: Instagram)

अगदी पहिल्याच मालिकेतून प्रेक्षनकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी एक मराठमोळी अभिनेत्री म्हणजे गायत्री दातार. तिच्या गोड हास्याने आणि उत्तम अभिनय कौशल्याने गायत्री ईशाच्या रूपात घराघरात पोहोचली. विशेष म्हणजे तिच्या या पहिल्याच मालिकेत तिला काम करण्याची संधी मिळाली ती म्हणजे मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीचा कलाकार सुबोध भावे याच्यासोबत. मालिका संपून काही महिने उलटून गेले असले तरी इशा आणि विक्रांतची गोष्ट अजूनही प्रेक्षकांच्या आठवणीत आहे.

इशाच्या फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी म्हणजे अभिनेत्री गायत्री दातार पुन्हा येणार आहे प्रेक्षकांच्या भेटीला पण यावेळी एका नव्या ढंगात. ती लवकरच दिसणार आहे झी युवा वाहिनीच्या 'युवा डान्सिंग क्वीन' या नव्या डान्स रिऍलिटी शोमधून.

गायत्रीच्या या नव्या प्रवासाबद्दल तिने LatestLY मराठी सोबत Exclusive संवाद साधला आहे. "माझ्या साठी डान्सिंग हे क्षेत्र पूर्णपणे नवं आहे, मी याआधी कधीही डान्स केलेला नाही. पण नवीन काहीतरी ट्रे करायचं म्हणून मी हा शो करण्यास होकार दिला. मला स्वतःला खरंतर अपग्रेड करायचं होतं," असं ती म्हणाली.

शोच्या शूटला सुरुवात झाली असल्याने त्या विषयी सांगताना गायत्री म्हणते, "हा शो शूट करताना आम्ही सर्वच खूप धमाल करतोय. टेन्शन तर आहेच. पण नवीन काहीतरी शिकायला मिळतंय त्याचं समाधानही आहे. मी प्रेक्षकांसाठी लोकनृत्य, वेस्टर्न, हिपहॉप असे विविध डान्स फॉर्म्स सादर करणार आहे."

Zee Marathi: होम मिनिस्टर आता पोहोचणार दिल्लीसोबत देशातील विविध शहरांत 

दरम्यान गायत्रीने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाद्वारे, ती एक नवा प्रोजेक्ट करणार असल्याचे सांगितले होते. आणि तो कोणता प्रोजेक्ट आहे याचं उत्तर म्हणजे तिचा हा नवा डान्स रिऍलिटी शो.