'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील राणादा रावडी लूकमध्ये दिसणार, आता चोर बनून सगळ्यांना फटकवणार (Video)
Hardik Joshi (Photo Credits-Instagram)

झी मराठी (Zee Marathi)  चॅनेलवरील प्रेक्षकांच्या पसंदीस पडणारी 'तुझ्यात जीव रंगला' (Tujhyat Jeev Rangala) या मालिकेतील फेम राणादा (Rana Da) उर्फ हार्दिक जोशी (Hardik Joshi) सर्वांचा लाडका बनला आहे. परंतु गेल्या काही दिवसांपूर्वी तो या मालिकेतून एक्झिट घेणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र आता राणादा एका नव्या लूक मधून मालिकेत झळकणार आहे.

हार्दिक जोशी याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला असून त्यामध्ये तुझ्यात जीव रंगला मधील त्याचा चोराच्या लूक समोर आणला आहे. त्यामध्ये तो हातचालाखीने चोरी करत असल्याचे त्या व्हिडिओतून दिसून येत आहे. तसेच आर. आर. उर्फ राजा राजगोंडा असे त्याचे नाव आता चोराच्या भुमिकेसाठी देण्यात आले आहे. ('तुझ्यात जीव रंगला' मधील राणादा ची होणार एक्झिट? समोर आला नवा प्रोमो)

 

View this post on Instagram

 

राजा राजगोंडा! R R!

A post shared by Hardeek Joshi (@hardeek_joshi) on

परंतु आता राजा राजगोंडा याचा हटके आणि रावडी लूक प्रेक्षकांना आवडतो का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. त्याचसोबत मालिकेच्या कथानकात आणि सेटमध्ये बदल करण्यात येतील असे सांगण्यात आले होते.