सुबोध भावे याच्या कान्हाज मॅजिक निर्मिती संस्थेच्या पहिल्यावहिल्या मालिकेचा प्रोमो आला समोर; सोशल मिडियावरून चाहत्यांना दिली बातमी
Shubh Mangal Online (Photo Credits: Instagram)

मराठी मालिकांसोबत मराठी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकणारा अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) यात मालिका निर्मिती क्षेत्रात आपले पाऊल टाकणार आहे. सुबोध भावे याच्या 'कान्हाज मॅजिक' या निर्मिती संस्थेद्वारे पहिली वहिली मराठी मालिका लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे. 'शुभमंगल ऑनलाईन' (Shubhmangal Online) असे या मालिकेचे नाव असून सुबोध भावे ने नुकताच याचा प्रोमो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे. या प्रोमो मध्ये सायली संजीव (Sayli Sanjeev), सुयश टिळक (Suyash Tilak), सुकन्या मोने (Sukanya Mone) दिसत आहे.

कलर्स मराठी वाहिनीवर येणा-या शुभमंगल ऑनलाईन या मालिकेचा पहिला प्रोमो तुमच्याशी शेअर करुन मला विलक्षण आनंद होत आहे असे सुबोध भावेने या पोस्ट खाली लिहिले आहे. Subodh Bhave Corona Positive: अभिनेता सुबोध भावे याला कोरोनाची लागण, पत्नी मंंजिरी आणि मुलगा कान्हा सुद्धा पॉझिटिव्ह

या मालिकेच्या प्रोमोवरुन आणि नावावरुन तरी लग्न जुळविण्यासाठी सध्या ऑनलाईन मुले-मुली पाहण्याचा ट्रेंड निघाला आहे त्यावरच आधारित ही मालिका असेल असे दिसतय. तसेच प्रेक्षकांना प्रथमच सायली संजीव आणि सुयश टिळक ही जोडी पाहायला मिळणार असल्याने सर्वांना या मालिकेची उत्सुकता लागून राहिली आहे.

दरम्यान सुबोध सहित  त्याची पत्नी मंंजिरी आणि मोठा मुलगा कान्हा यांंचे सुद्धा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे सांंगितले आहे. सुदैवाने या तिघांंची तब्येत सध्या स्थिर असुन कोरोनाची लक्षणे सुद्धा सौम्य आहेत, त्यामुळे डॉक्टरांंच्या सल्ल्यानुसार सुबोध आणि परिवार घरीच क्वारंंटाईन झाले आहेत. आम्ही तज्ञ डॉक्टरांंच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेत आहोत तुम्ही सुद्धा तुमची काळजी घ्या, गणपती बाप्पा मोरया अशी पोस्ट सुबोधने केली आहे.