मराठी चित्रपट, मालिका, नाटक सर्वच प्लॅटफॉर्मवर गाजलेलं नाव म्हणजेच अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) हा आता कोरोनाला (Coronavirus) सुद्धा लढा देत आहे. सुबोधने आपल्या सोशल मीडियावरुन चाहत्यांंना काही वेळापुर्वी धक्का देत आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. सुबोध सहित च त्याची पत्नी मंंजिरी आणि मोठा मुलगा कान्हा यांंचे सुद्धा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे सांंगितले आहे. सुदैवाने या तिघांंची तब्येत सध्या स्थिर असुन कोरोनाची लक्षणे सुद्धा सौम्य आहेत, त्यामुळे डॉक्टरांंच्या सल्ल्यानुसार सुबोध आणि परिवार घरीच क्वारंंटाईन झाले आहेत. आम्ही तज्ञ डॉक्टरांंच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेत आहोत तुम्ही सुद्धा तुमची काळजी घ्या, गणपती बाप्पा मोरया अशी पोस्ट सुबोधने केली आहे.
दरवर्षी प्रमाणे भावेंच्या घरी बाप्पाचे आगमन झाले होते, यावेळी सर्व काळजी घेत दीड दिवस बाप्पाचे आदरातिथ्य करुन रविवारी सुद्धा अगदी घरगुती पद्धतीने सुबोध व परिवाराने बाप्पाच्या मुर्तीचे विसर्जन केले होते. लॉकडाउन लागु झाल्यापासुन सुबोध परिवारासोबत घरीच आहे.
सुबोध भावे Instagram Post
दरम्यान सुबोध भावे याच्या आटपाडी नाईटस सिनेमाला नुकतेच झी गौरव पुरस्काराची सहा बक्षिसे प्राप्त झाली आहेत. या चित्रपटात पहिल्यांंदाच सुबोधने चित्रपटाचा प्रस्तुतकर्ता (presenter) म्हणुन काम केले आहे. याशिवाय लहान मुलांंसाठी गोष्टी सांंगत एक मजेशीर युट्युब सीरीज सुद्धा त्याने अलिकडे सुरु केली आहे.