Genelia D'souza Tests Negative for COVID-19: जेनेलिया डिसूजा हिची कोरोनाविरुद्धची झुंज ठरली यशस्वी; सोशल मिडियावर माहिती देताच सेलिब्रिटींनी केला अभिनंदनाचा वर्षाव
Genelia Deshmukh (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री आणि रितेश देशमुखची (Riteish Deshmukh) पत्नी जेनेलिया डिसूजा (Genelia Deshmukh) हिला 3 आठवड्यांपूर्वी कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती नुकतीच जेनेलियाने सोशल मिडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना आणि सेलिब्रिटींनी दिली. आपण कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून काल आपली कोविड-19 (COVID-19) ची चाचणी निगेटिव्ह आल्याचे सांगितल्यानंतर जेनेलियावर तिच्या चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. ट्विटच्या माध्यमातून तिच्या मित्रपरिवाराने तिला शुभेच्छा दिल्या.

कोरोनावर मात करून आपण तीन आठवड्यांनी आपल्या घरी आलो आहोत असे जेनेलियाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

हेदेखील वाचा- Abhishek Bachchan Tested COVID 19 Negative: अभिनेता अभिषेक बच्चन झाला कोरोना मुक्त, ट्विट करुन म्हणतो मी करुन दाखवलं!

ती कोरोनामधून बरी झाल्याचे कळताच तिच्या अनेक सेलिब्रिटी मित्रपरिवाराने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

सोफी चौधरी

श्रुति सेठ

तारा शर्मा

फराह खान

कुणाल कोहली

 

अलिकडेच बिग बी अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चनसह पत्नी ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्या देखील कोरोनावर मात करुन घरी परत आले आहेत. आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींसह गायकांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.

दरम्यान गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) राहत असलेल्या मुंबईतील पेडर रोडवरील 'प्रभुकुंज' इमारतीत (Prabhu Kunj Building) 11 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महानगरपालिकेकडून प्रभुकुंज इमारत सील करण्यात आली आहे. लता मंगेशकर आणि त्यांचे कुटुंब सुरक्षित आहे. प्रभुकुंज इमारतीत वयोवृद्ध व्यक्तीचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे BMC ने शनिवारी रात्री संपूर्ण इमारत सील केली.