Abhishek Bachchan Tested COVID 19 Negative: अभिनेता अभिषेक बच्चन झाला कोरोना मुक्त, ट्विट करुन म्हणतो मी करुन दाखवलं!
Abhishek Bachchan (Photo Credits: Twitter)

अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) याने अखेरीस आज कोरोनावर (Coronavirus)  मात केली आहे. बिग बी (Big B) अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांंच्या पाठोपाठच त्याला सुद्धा कोरोनाची लागण झाली होती, ज्या नंंतर ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan)  आणि आराध्या बच्चन (Aradhya Bachchan) यांंचे कोरोना अहवाल सुद्धा पॉझिटिव्ह आले होते, या अन्य तिघांनी काही दिवसांपुर्वीच कोरोनावर मात केली होती मात्र आजपर्यंत अभिषेक वर मुंंबईतील नानावटी रुग्णालयात (Nanavati Hospital)  उपचार सुरु होते, आज, 8 ऑगस्ट रोजी दुपारी त्याचे कोरोना अहवाल निगेटीव्ह आले असुन आता अखेरीस तो सुद्धा या विषाणुला हरवुन घरी परतण्याच्या मार्गावर आहे.

अभिषेक बच्चन याने आपण कोरोना मुक्त झाल्याची माहिती देताना एक खास ट्विट केले आहे. "आज दुपारी मी कोविड 19 ची वर मात केली आहे, मी तुम्हाला म्हणालो होतो मी या कोरोनाला नक्की हरवेन आणि मी हे करुन दाखवलेच. या काळात माझ्या प्रकृतीसाठी काम व प्रार्थना केलेल्या डॉक्टर आणि फॅन्सचे मी आभार मानतो. मी सदैव तुमचा ऋणी राहीन". अशा शब्दात अभिषेक ने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अ‍भिषेक बच्चन ट्विट

दरम्यान अॅमेझॉन प्राईमवर (Amazon Prime) रिलीज झालेली अभिषेक बच्चन याची वेबसिरीज ब्रीद: इनटू द शॅडोज सुद्धा प्रेक्षकांचे कौतुक मिळवत आहे मात्र कोरोनाच्या विळख्यात अडकल्याने ते कौतुक अभिषेकला एन्जॉय करता येत नव्हते आता लवकरच घरी परतल्यावर या सीरीजच्या यशाची सुद्धा जोरदार पार्टी होऊ शकते.