Bigg Boss 14: सलमान खान बिग बॉसच्या सीझन साठी सज्ज; पहा नव्या प्रोमोची पहिली झलक
सलमान खान (Photo Credits: Twitter)

लॉकडाऊनमध्ये पनवेलच्या फार्महाऊसमध्ये राहत असलेला सलमान खान (Salman Khan) मागील काही दिवसांपासून मुंबईत मेहबूब स्टुडिओमध्ये दिसला होता. दरम्यान येथे शूट झालेल्या बिग बॉस 14 च्या पहिल्या प्रोमोचा फोटो आता सोशल मीडीयामध्ये शेअर करण्यात आला आहे. दरम्यान सलमान खान लादी पुसत असलेला हा फोटो मजेशीर अंदाजामधील आहे. "घर के सब काम कर लो खत्म क्योंकि अब सीन पलटेगा!" अशा कॅप्शन सह हा फोटो शेअर करण्यात आला आहे.

बिग बॉस ट्वीट

फोटो कॅप्शनमधून हा संकेत मिळाला आहे की यंदाच्या बिग बॉस सीझन 14 मध्ये काही खास आणि हटके अंदाज बघायला मिळणार आहे. दरम्यान काही मीडीया रिपोर्ट्सनुसार, यंदाचा सीझन लॉकडाऊन आणि सोशल डिस्टंसिंग यांच्या अवतीभवती फिरणार्‍या थीमवर असू शकतो. याबाबत अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. मागील काही दिवसांत बिग बॉसच्या घरात निया शर्मा एंट्री घेणार असल्याच्यादेखील चर्चा रंगल्या होत्या.

बिग बॉस हा लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो आहे. मागील अनेक सीझन सलमान खान त्याचे होस्टिंग करत आहे. दरम्यान सलमानचं स्पर्धकांना खडसावणं, त्यांची फिरकी घेणं त्याच्या फॅन्सला, बिग बॉसच्या चाहत्यांना अवडतं त्यामुळे टीआरपी रेटिंगमध्येही अनेकदा हा शो अव्वल स्थानावर पहायला मिळाला आहे.