झी युवा वाहिनी वर 6 एप्रिलपासून सुरु होणार 1 तासाचा थरार, 'रात्रीस खेळ चाले- भाग 1' आणि 'एक घर मंतरलेलं' मालिका पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Zee Yuva serial (Photo Credits: File Image)

लॉकडाऊनच्या काळात लोकांना घरात खिळून ठेवण्यासाठी मनोरंजनाचा भाग म्हणून जुन्या लोकप्रिय मालिका पुन्हा प्रक्षेपित करण्याचा सरकारचा प्रयत्न ब-यापैकी यशस्वी ठरत आहे. याची सुरुवात रामायण मालिकेपासून. लोकांच्या आग्रहास्तव ही मालिका सुरु झाली. त्यापाठोपाठ महाभारत, शक्तिमान या मालिकाही सुरु झाल्या. त्याचबरोबर झी मराठी वरच्या लोकप्रिय मालिका 'स्वराज्यरक्षक संभाजी' पाठोपाठ, 'जय मल्हार' आणि 'तुला पाहते रे' या मालिका देखील येत्या 6 एप्रिलपासून झी मराठीवर सुरु होत आहेत. त्यापाठोपाठ आता लोकांना भयभीत करणा-या 2 लोकप्रिय मालिका झी युवा वाहिनीवर सुरु होत आहेत. या मालिका आहेत 'रात्रीस खेळ चाले- 1' आणि 'एक घर मंतरलेलं'.

झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले या मालिकेने लोकांच्या मनात घर केले होते. त्यामुळे लोकांना मनोरंजन म्हणून आणि घरात खिळून ठेवण्यासाठी 'रात्रीस खेळ चाले- 1' आणि 'एक घर मंतरलेलं' या मालिका झी युवा वाहिनीवर येत्या 6 एप्रिलपासून पुन्हा सुरु होत आहे. या मालिका सोमवार ते गुरुवार रात्री 9.30 ते 10.30 दरम्यान दाखविण्यात येणार आहेत. यात रात्री 9.30 वाजता 'रात्रीस खेळ चाले-1' ही मालिका तर 10 वाजता एक घर मंतरलेलं ही मालिका प्रसारित केली जाणार आहे.

कोकणच्या पार्श्वभूमीवर चित्रीत करण्यात आलेली ही मालिका लोकांमध्ये खूपच लोकप्रिय झाली होती. तर दुसरीकडे सुरुची अडारकर आणि सुयश टिळक यांची मुख्य भूमिका असलेली एक घर मंतरलेलं ही लोकांच्या चर्चेचा विषय बनली होती. स्वराज्यरक्षक संभाजी पाठोपाठ आता ‘तुला पाहते रे’ आणि ‘जय मल्हार’ सुद्धा येणार प्रेक्षकांच्या भेटीला; जाणुन घ्या प्रक्षेपणाच्या वेळा

त्याचबरोबर झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर ‘तुला पाहते रे’ व ‘जय मल्हार’ या दोन जुन्या मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. येत्या 6 एप्रिलपासून या दोन्ही मालिका पुन्हा सुरू होणार आहेत. दुपारी 12 वाजता तुला पाहते रे तर संध्याकाळी 6 वाजता जय मल्हार अशा या मालिकेच्या प्रक्षेपणाच्या वेळा आहेत.