Raju Sapte Suicide Case: कलादिग्दर्शक राजेश साप्ते आत्महत्येनंतर मराठी कलाकार एकवटले; राज ठाकरे, पोलिस आयुक्तांची भेट ते फरार आरोपींचे फोटो शेअर करत तपास कार्यात मदत करण्याचे केले आवाहन
Marathi Actors On Raju Sapte Suicide Case| PC: Instagram/ Shalini Thackeray, Twitter/ Saoumitra Pote

कलादिग्दर्शक राजू साप्ते (Raju Sapte) यांनी शनिवार, 3 जुलै दिवशी लेबर युनियन लीडरच्या जाचाला कंटाळून आत्महत्येसारखे टोकाचं पाऊल उचललं आहे. या बातमीने अवघी मराठी कलासृष्टी हळहळली आहे. कला क्षेत्रातील लहान मोठ्या समस्यांचा आढावा घेण्यासाठी आज काही कलाकार मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना (Raj Thackeray) भेटले आहेत तर काहींनी सोशल मीडीयामधून राजू सापते यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या आतमहत्येला कारणीभूत असणार्‍या काहींचे फोटो आणि नंबर शेअर पोलिसांना तपास कार्यात मदत करण्याचं आवाहन केले आहे. काल (5 जुलै) आदेश बांदेकर यांनी देखील पोलिस आयुक्तांची भेट घेऊन या बाबत सविस्तर चर्चा केली आहे.

राजू साप्ते यांनी आत्महत्येपूर्वी एक व्हिडिओ शेअर करत लेबर युनियनचे राकेश मौर्या याच्या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलत असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी पुण्यात आपल्या राहत्या घरी गळफास घेत जीवन संपवलं. यानंतर त्यांच्या पत्नीकडूनही काहींची नावं समोर आली आहेत. सध्या या प्रकरणी मुंबई आणि पिंपरी चिंचवड पोलिस स्टेशन मधून काही टीम्स काम करत आहेत.

मराठी कलाकार एकजुटले

राज ठाकरेंची भेट

 

View this post on Instagram

 

A post shared by shalinithackeray (@shalinithackeray)

पोलिस आयुक्तालयात कलाकार

निवेदिता सराफ यांचं आवाहन

'अग्गंबाई सूनबाई' या मालिकेच्या सेटचं काम राजू साप्ते यांच्याकडे होते. त्यांनी महाराष्ट्रात आणी राज्याबाहेरही शूटिंगसाठी कमी दिवसात उत्तम सेट उभा केला होता अशी आठवण शेअर करताना त्यांच्या कुटुंबीयाला न्याय मिळवून देण्यासाठी आवाहन केले आहे.

फरारी आरोपींना पकडण्याचं आवाहन

दरम्यान राजू साप्ते आत्महत्या प्रकरणी आतापर्यंत चंदन ठाकरे आणि नरेश विश्वकर्मा यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अद्याप तिघांचा शोध सुरू आहे. आज राज ठाकरेंसोबत झालेल्या बैठकीमध्ये मराठी कलाकारांनी एकत्र येत सध्याची युनियन विसर्जित करून पुन्हा नव्याने सार्‍या क्षेत्रातील मंडळी एकत्र येऊन नवी युनियन स्थापन करतील असे ठरले आहे. या वेळी कलाकारांसोबत अमेय खोपकर, शालिनी ठाकरे देखील उपस्थित होते. तर विधिमंडळामध्येही आज गृहमंत्र्यांनी राजू साप्ते यांच्या आत्महत्येचा प्रश्न घेतला होता.