मराठी टेलिव्हिजन मालिका 'तुझ्यात जीव रंगला'(Tuzyat Jeev Rangla) यामधील फेम कलाकार मिलिंद दस्ताने (Milind Dastane) यांनी पीएनजी ब्रदर्सला (PNG Brothers) फसवल्याचा आरोप लावण्यात आला होता. तसेच या प्रकारावरुन पोलिसांकडून चौकशीसुद्धा करण्यात आली. मात्र आता दस्ताने आणि त्यांच्या पत्नीला पोलिसांनी अटक केली असून 21 जून पर्यंत कोठडी सुनावली आहे.
याबद्दल अधिक वृत्त महाराष्ट्र टाईम्स यांनी दिले आहे. तर मिलिंद दास्ताने यांनी औंध (Aundh) येथील पीएनजी ब्रदर्स (PNG) या दागिन्यांच्या व्यापाऱ्यांनी अफरातफरीचा आरोप लावला आहे. दास्ताने दाम्पत्यांने तब्बल 25 लाख रुपये किमतीच्या दागिन्यांची आणि सोन्याच्या बिस्किटांची खरेदी करून त्याचे पैसेच चुकवले नाहीत असा आरोप पीएनजी ब्रदर्सच्या अक्षय गाडगीळ यांनी केला होता. याबाबत अभिनेता मिलिंद दास्ताने आणि त्यांची पत्नी सायली दास्ताने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. औंध येथील चतुःश्रुंगी पोलिस ठाण्याच्या अंतर्गत या प्रकरणाचा तपास सुरु होता. मात्र अखेर आज या दापत्यांना अटक करण्यात आली आहे.
(पुणे: मराठी अभिनेत्यावर 25 लाखाच्या फसवणुकीचा आरोप, पोलिसांचा तपास सुरु)
18 ऑक्टोबर रोजी मिलिंद दास्ताने आणि त्यांच्या पत्नी पुन्हा दुकानात आले. त्यांनी सोन्याचे दागिने, बिस्किटे, हिऱ्याची अंगठी, चांदीचे दागिने असे एकूण 25 लाख 69 हजार रुपयांचे दागिने खरेदी केले. या वेळेची रक्कम मोठी असल्याने अक्षय हे वारंवार मिलिंद यांना कॉल करून पेमेंट बाबत विचारणा करू लागले. मात्र याचा काही फायदा न होता उलट मिलिंद यांनी सतत वेगळी करणे द्यायला सुरवार केली त्यामुळे अखेरीस वैतागून अक्षय यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात दास्ताने दाम्पत्याच्या विरुद्ध तक्रार नोंदवली होती.