Praveen Kumar Sobti Passes Away: 'महाभारत' मालिकेत 'भीम' साकारणार्‍या प्रविण कुमार सोबती यांचे निधन
BR Chopra | PC: Twitter

बी आर चोप्रा ( B.R. Chopra) यांच्या महाभारत मधील 'भीम' (Bheem) ची भूमिका साकारणारे अभिनेते प्रविण कुमार सोबती यांचे निधन झाले आहे. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे. मागील अनेक वर्षांपासून प्रवीण कुमार सोबती (Praveen Kumar Sobti ) आजारपण आणि आर्थिक तंगीने चिंतेत होते. भारदस्त शरीरयष्टी असणार्‍या प्रवीण कुमार यांनी खेळाडू म्हणून आपल्या करियरची सुरूवात केली होती. खेळाडू म्हणून करियरची सुरूवात केल्यानंतर त्यांनी बॉलिवूड कडे आपला मोर्चा वळवला. अनेक सिनेमांमध्ये त्यांनी विलनचा रोल साकारला आहे. पण त्यांना लोकप्रियता मिळाली ती बीआर चोपड़ा यांच्या ‘महाभारत’मालिकेतून. या मालिकेत त्यांनी 'भीम' साकारला होता. दिल्ली मध्ये त्यांचे निधन झाले असून Punjabi Bagh मध्ये आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

प्रविण कुमार सओबती आपल्या कारकीर्दी मध्ये अमिताभ बच्चन, जितेंद्र यांच्यासोबतही काम केले आहे. 1981 साली 'रक्षा' सिनेमामधून आपल्या फिल्मी करियरला सुरूवात केली आहे. 'मेरी आवाज सुनो' मध्येही त्यांनी महत्त्वाची भूमिका सकारली आहे. ‘शहंशाह’या बीग बींच्या सुपरहीट सिनेमामध्येही त्यांचा सहभाग होता. यासोबत चाचा चौधरी सिरियल मध्ये त्यांनी 'साबू' ची भूमिका साकारली होती. हे देखील नक्की वाचा: मुस्लिम व्यक्तीनं गायलेल्या Mahabharat Title Song चा व्हिडिओ वायरल; नेटकर्‍यांनी केलं आवाजासह संस्कृत उच्चारणाचं कौतुक.

कलाकार असण्यासोबतच प्रविन कुमार सोबती हे डिस्कस थ्रो एथलीट देखील होते. त्यांनी आशियाई खेळांमध्ये चार वेळेस मेडेल्स पटकावली आहेत. यामध्ये 2 गोल्ड मेडेल्स आणि एक ब्रॉन्झ पदक आहे. ऑलंपिक खेळांमध्येही त्यांनी सहभाग घेतला होता. अर्जुन पुरस्काराने देखील ते सन्मानित झाले आहेत. त्यांना बीएसएफ मध्ये डेप्युटी कमांडेंट म्हणून नोकरी स्विकारली होती.