भारतामध्ये 80च्या उत्तरार्धात आणि नव्वदीच्या सुरूवातीच्या दिवसांमध्ये अनेक घरात रविवारची सकाळ ही टीव्ही समोर रामायण (Ramayan) आणि महाभारत (Mahabharat) पाहून होत असे. हिंदू धर्मीयांसाठी रामायण, महाभारत सुरू झालं की सारेच टीव्ही समोर बसत असे. आपोआपच अनेकांचे हात जोडले जायचे. मध्यंतरी लॉकडाऊन मध्येही अनेकांनी पुन्हा रामायण, महाभारत पाहिलं असेल तर सध्या सोशल मीडीयामध्ये एक मुस्लिम व्यक्ती महाभारत चं टायटल ट्रॅक (Mahabharat Title Track) गातानाचा व्हिडीओ वायरल होत आहे.

भारताचे माजी चीफ इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया Dr S Y Quraishi यांनी मुस्लिम व्यक्तीचा व्हिडिओ शेअर केला आहे. मूळात महाभारतचं टायटल ट्रॅक गायक महेंद्र कपूर यांनी गायलं आहे. विविधतेने नटलेल्या भारतामध्ये एकमेकांच्या संस्कृतीचं गुंफण आणि संगीताला जाती-धर्माचं बंधन असूच शकत नसल्याचं पुन्हा या व्हिडिओमधून ठळकपणे दिसून येत आहे. महाभारत कथा चं शीर्षकगीत अगदी interlude सह गात ते डोलणारा मुस्लीम व्यक्ती पाहून अनेक नेटकर्‍यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Dr S Y Quraishi ट्वीट

Beating the stereotypes या कॅप्शन सह त्यांनी ट्विटर वर व्हिडिओ पोस्ट केला आहे.

नेटकर्‍यांच्या प्रतिक्रिया

असं आहे भारताचं सौंदर्य

संस्कृत उच्चारणाचं कौतुक

संगीताला बंधन नाही

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)