‘कुसुम’ आणि ‘कुमकुम’ यांसारख्या प्रसिद्ध टीव्ही सिरीयलमधील अभिनेता अनुज सक्सेनाविषयी (Anuj Saxena) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 141 कोटींची फसवणूक केल्याच्या आरोपावरून अभिनेत्याला अटक करण्यात आली आहे. अनुज अभिनयाशिवाय एल्डर फार्मास्युटिकल्सचा (Elder Pharmaceuticals) सीओओ देखील आहे. या कंपनीमार्फत ही फसवूक केली गेली असल्याचे निदर्शनास आले आहे. यासह अनुजवर इतरही अनेक केसेस आहेत. अशा परिस्थितीत अनुज सक्सेनाला मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. ही तक्रार कंपनीतील एका गुंतवणूकदाराने केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की 2012 मध्ये अनुजने त्यांना गुंतवणूकीच्या बदल्यात अधिक चांगल्या परताव्याचे वचन दिले होते, जे अजूनही पूर्ण झाले नाही.
ईओडब्ल्यूने अनुज सक्सेच्या कस्टडीला कंपनीचा सीओओ म्हणून अनुजच्या भूमिकेबद्दल चौकशी करण्यास सांगितले आहे. परंतु अनुजाने या याचिकेला विरोध दर्शविला आहे. अनुजचे म्हणणे आहे की, तो एक वैद्यकीय व्यवसायी आहे आणि सध्या त्यांची कंपनी पीपीई किट आणि सॅनीटाझर्स बनवित आहे. या गोष्टी सध्याच्या महामारीच्या काळात आवश्यक आहेत, त्यामुळे ही चौकशी पुढे ढकलली पाहिजे अशी त्याची मागणी आहे.
यावर न्यायाधीश अभिजीत नांदगावकर म्हणाले की, भलेही कोविड-19 च्या परिस्थितीत अनुजची कंपनी किट्स व सॅनीटाझर्स मॅन्युफॅक्चरिंग करत असेल, परंतु आम्ही गुंतवणूकदारांनी केलेल्या फसवणूकीच्या याचिकेकडे दुर्लक्ष करू शकत नाही. त्यानंतर अनुजला सोमवारपर्यंत ईओडब्ल्यूच्या ताब्यात पाठविण्याचे निर्देश देण्यात आले.
दरम्यान, एकता कपूरच्या 'कुसुम' या टीव्ही कार्यक्रमातून अनुज सक्सेनाने दमदार एन्ट्री केली होती. या शोमध्ये अनुजने कुसुमचा नवरा अभय कपूरची व्यक्तिरेखा साकारली होती. या शोमुळे अनुज घराघरात पोहोचला होता. यानंतर तो कुमकुम, कुछ पल साथ तुम्हारा, सारा आकाश, सोला श्रृंगार सारख्या अनेक हिट शोजमध्ये तो दिसला होता.