Naagin 4 च्या पहिल्या प्रोमो मध्ये पाहा नव्या सीझन ची छोटी झलक (Video Inside)
Naagin 4 (Photo Credits: Facebook)

'नागिन' हा रहस्यमय कथेवर आधारित असणारा टीव्ही शो पुन्हा येत आहे नव्या सीझनसोबत प्रेक्षकांच्या भेटीला. या शोचे पहिले तीन सीझन भरपूर हिट झाले आणि म्हणूनच चॅनेलने 'नागिन 4' हा सीझन बनवायचा निर्णय घेतला होता. चौथा सीझन येणार असल्याची घोषणा फार आधी करण्यात आली असल्याने, यात काय असणार हा विचार करून प्रेक्षकांची शोबद्दलची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली होती. पण नुकताच कलर्स टीव्ही या वाहिनीने शोच्या नव्या सीझनचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या प्रोमोच्या माध्यमातून शोच्या कथानकावरून व त्यात असणाऱ्या अनेक रहस्यांवरील पडदा उठवण्यात आला आहे. त्याचसोबत नागिन 4 मध्ये निया आणि जास्मिन यांच्या भूमिका काय असणार आहेच हे सुद्धा स्पष्ट करण्यात आलं आहे.

या प्रोमोच्या सुरुवातीला एका लग्नाचा प्रसंग दिसतो. या शोमध्ये सायंतनी घोष एका इच्छाधारी नागिणीच्या रूपात दिसते. पण तिचं एका माणसावर प्रेम होतं आणि त्याच्याशी लग्न करून ती संसार सुरु करते. नंतर त्या दोघांना एक मुलगी होते. आणि ते जेव्हा गावी जातात तेव्हा काही लोक त्याच्या कुटुंबाला मारून टाकायचा प्रयत्न करतात.

Bigg Boss 13: सलमान खान आजारपणामुळे सोडणार शो? फराह खान असू शकते नवी होस्ट

ते सायंतनी घोषला दरीत फेकून देत असताना, तिची मुलगी तिच्या डोळ्यात मारून टाकणाऱ्यांचं प्रतिबिंब बघते. आणि अशा रीतीने बदल घेण्याचा खेळ सुरु होतो.

प्रोमोमध्ये नंतर विजेंद्र आणि निया शर्मा यांची एंट्री होते. तसेच निया आणि जास्मिन यांच्यात काहीतरी कनेक्शन आहे. नागिनचा हा नवा सीझन सुरु होणार आहे येत्या शनिवारपासून म्हणजेच 14 डिसेंबर पासून.