
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान याने हिंदी टेलिव्हिजन विश्वातील कॉंट्रोव्हर्शिअल शो ‘बिग बॉस 13' सोडल्यास फिल्ममेकर फराह खान हा शो होस्ट करू शकते. "सलमान हा कार्यक्रम सोडत आहे आणि फराह खान जानेवारीपासून सूत्रसंचालनचा पदभार स्वीकारणार आहे. सेटवर फक्त सलमान आपला वाढदिवस साजरा करण्याची अपेक्षा आहे," असं टीव्ही इंडस्ट्रीतील एका सूत्राने IANS ला सांगितले आहे.
एका वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, 27 डिसेंबरला 54 वर्षांचा झालेला "दबंग" स्टार त्याची प्रकृती बिघडल्यामुळे हा शो सोडत आहे.
तसेच रिपोर्ट्सनुसार सलमान ट्रायजेमिनल न्यूरेल्जियातून बरा झाला आहे आणि त्याच्या नातेवाईकांनी आणि प्रियजनांनी त्याला हा शो सोडण्याचा सल्ला दिला आहे. कारण तो पुन्हा रागावू नये अशी त्यांची इच्छा आहे.
"सलमान ट्रायजेमिनल न्यूरेल्जिया नावाच्या आजारातून नुकताच बरा झाला आहे. आणि आता जर तो जास्त रागावला तर त्याच्या नसांना त्रास होऊ शकतो. पण दर आठवड्याला कोणी ना कोणी स्पर्धक त्याला चिडचिड करायला भाग पडतो, जे आता त्याच्या तब्येतीसाठी योग्य नाही. आणि म्हणूनच तो होस्ट करत असलेला बिग बॉस या शो चा हा शेवटचा सीझन असणार आहे,”असं इंडस्ट्रीतील एका सूत्राने डेक्कन क्रॉनिकलला सांगितलं आहे.
Bigg Boss 13 : पारस छाब्रा च्या गर्लफ्रेंडने लीक केले पर्सनल चॅट? पाहा हे फोटो
"त्याला मागील काही सीझनपासूनच हा शो सोडण्याची इच्छा होती, परंतु चॅनेल आणि प्रॉडक्शन हाऊसने कशीबशी त्याची समजूत काढली. परंतु आता जवळच्या लोकांनी त्याला स्पष्टपणे सांगितले आहे की या शोमुळे त्याला कोणत्याही प्रकारची दुखापत होऊ नये," त्याचे कुटुंब आणि मित्र त्याच्याबद्दल काळजी घेत आहेत, असेही त्या सूत्रांनी सांगितले.
सलमान खान आता जवळपास एक दशकापासून कलर्स वाहिनीच्या या शोचा एक भाग आहे. 2011 मध्ये तो ‘बिग बॉस’ च्या चौथ्या सीझनमध्ये सामील झाला होता.