Munawar Faruqui Bigg Boss 17 Winner: मुनावर फारुखी ठरला बिग बॉसच्या 17 चा विजेता, वाचा कोणाला दिले त्यांनी यशाचे श्रेय

बिग बॉसच्या 17 (Bigg Boss 17) चा विजेता म्हणून मुनावर फारुखीचं (Munawar Faruqui) नाव समोर आलं आहे. विजेत्याच्या नावाची घोषणा झाल्यानंतर  त्याच्या चाहत्यांनी जल्लोष केला आहे. बिग बॉसमधून मुनावरनं चाहत्यांचे निखळ मनोरंजन केले होते. अभिषेक कुमार (Abhishekh Kumar), अरुण शेट्टी, मनारा चोप्रा, अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि मुनावर शेख हे टॉपमधील स्पर्धक होते. त्यात सर्वाधिक स्पर्धा ही अभिषेक आणि मुनावरमध्येच होती. त्यात अखेर मुनावरनं विजेता म्हणून आपली मोहोर उमटवली आहे. या विजयानंतर मुनावरने केलेले वक्तव्याने सर्वांच्या भुवया उंचवल्यात.  (हेही वाचा - Bigg boss 17 मधील ‘या’ खेळाडूला रोहित शेट्टीने दिली ‘खतरों के खिलाडी’ शोची ऑफर)

पाहा पोस्ट -

 

आपल्या मुलाखतीमध्ये मुनावरनं म्हटलं आहे की, माझ्या यशाचे श्रेय हे मलाच मी देतो. त्याला कारण म्हणजे आजवरच्या आयुष्यात ज्याला सामोरं गेला आहे त्यातील अपयशातून मला खूप काही शिकायला मिळाले आहे. मला जे अपयश आले त्याचा मी सामना केला आहे. तसेच माझी अभिषेक, मनारा आणि अंकितासोबतची मैत्री ही कायम राहिल. असेही मुनावरनं यावेळी सांगितले. बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यासोबतच त्याला 50 लाख रुपयांचे बक्षीसही मिळाले आहे. याशिवाय त्याला एक अलिशान कारही गिफ्ट म्हणून देण्यात आली आहे.