लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मयुरी देशमुख ने दिला पतीसोबतच्या खास क्षणांना उजाळा (View Post)
Mayuri Deshmukh & Ashutosh Bhakre (Photo Credits: Instagram)

अभिनेत्री मयुरी देशमुख (Mayuri Deshmukh) हिचा पती अभिनेता आशुतोष भाकरे (Aashutosh Bhakre) याने काही महिन्यांपूर्वी आत्महत्या केली. नैराश्यातच्या गर्तेत अडकलेल्या आशुतोषने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. त्यानंतर मयुरीला जबर धक्का बसला. परंतु, त्यातून हळूहळू सावरत असलेल्या मयुरीने आज लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पतीसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. यासाठी तिने गेल्या वर्षीच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटोज शेअर करत भावूक पोस्ट केली आहे.

मयुरीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, गेल्या वर्षी, "याच दिवशी... आमचा लग्नाचा वाढदिवस... नेहमीच्या रोमांटिक ऐवजी आपण अॅन्डव्हॅचरस डेटवर गेलो होतो, याचा मला आनंद आहे. त्यामुळे आपण खूप हसलो... आमच्या हसण्याच्या अनेक आठवणी आहेत. प्रेम." (पतीच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री मयुरी देशमुख हिचं 'इमली' मालिकेतून कमबॅक; Watch Promo)

पहा पोस्ट:

 

View this post on Instagram

 

A post shared by Mayuri :) (@mayurideshmukhofficialll)

यापूर्वी मयुरीने आशुतोषच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट करत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली होती. त्यानंतर मोजक्यात पोस्ट करणाऱ्या मयुरीने आज लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पतीसोबतच्या आठवणी जागवल्या आहेत. (पतीच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री मयुरी देशमुख हिने पहिल्यांदाच शेअर केला व्हिडिओ; पहा काय म्हणाली)

'खुलता कळे खुलेना...' या मालिकेतून मयुरी घराघरांत पोहचली. त्यानंतर 'तिसरे बादशाह हम...' या नाटकाच्या निमित्ताने तिचे रंगभूमीवर काम प्रेक्षकांच्या अनुभवायला मिळाले. आता 'इमली' हा हिंदी मालिकेतून मुयरी रसिकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत गश्मीर महाजनी आणि सुम्बुल तौकीर प्रमुख भूमिकेत आहेत.