'खुलता कळी खुलेना' फेम अभिनेत्री मयुरी देशमुख (Mayuri Deshmukh) लवकरच छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. पती आशुतोष भाकरे (Aashutosh Bhakre) याच्या आत्महत्येनंतर स्वतःला सावरत पुन्हा एकदा छोट्या पडदा गाजवायला मयुरी सज्ज झाली आहे. स्टार प्लस (Star Plus) वाहिनीवरील 'इमली' (Imli) या मालिकेतून मयुरी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही तिची पहिलीच हिंदी मालिका असून मराठमोळा अभिनेता गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) सोबत ती झळकणार आहे. (पतीच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री मयुरी देशमुख हिने पहिल्यांदाच शेअर केला व्हिडिओ; पहा काय म्हणाली)
खुद्द मयुरीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. हा प्रोमो शेअर करताना तिने लिहिले की, "प्रिय मंडळी, तुम्ही पाठवलेल्या प्रत्येक हिलिंग थॉट महत्त्वाचा आहे... प्रत्येक लव्हिंग वाईब बदल घडवतो... मी आणि माझ्या कुटुंबियांसाठी केलेली प्रत्येक सुंदर प्रार्थनेसाठी मी कृतज्ञ आहे... तुमच्या प्रेमातून ऊर्जा घेऊन नवी सुरुवात करत आहे... पुन्हा एकदा तुमच्या शुभेच्छांची गरज आहे."
मयुरी देशमुख पोस्ट:
प्रोमोतून तीन प्रेमी जीवांची कथा या मालिकेतून दाखवण्यात येणार असल्याचे स्पष्ट होते. लवकरच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून मयुरी यात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.
अभिनेता आशुतोष भाकरे याने 29 जुलै रोजी नांदेड मधील आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. नैराश्याविरुद्धची लढाई जिंकत आलेल्या आशुतोषने टोकाचे पाऊल उचल्याने मयुरीसह कुटुंबियांना जबर धक्का बसला. त्यातून सावरत मयुरी इमली मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.