 
                                                                 'खुलता कळी खुलेना' या झी मराठीवरील मालिकेतून घराघरात पोहोचलेली मयुरी देशमुख (Mayuri Deshmukh) हिच्या पतीने आशुतोष भाकरे (Aashutosh Bhakre) काही दिवसांपूर्वी नांदेडमधील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर पूर्णपणे कोलमडून गेलेल्या मयुरीने काल (11 ऑगस्ट) ला आपल्या पतीच्या वाढदिवसानिमित्त सोशल मिडियावर खास भावनिक पोस्ट शेअर केली आहे. आशुतोषच्या वाढदिवसानिमित खास केक बनवून तो फोटो मयुरीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. त्याखाली आपल्या पतीसाठी खूप भावनिक संदेश लिहित आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
“आशुडा, तुझ्या वाढदिवशी सर्वोत्तम केक तयार करता यावा, केवळ यासाठी मी लॉकडाऊनच्या काळात 30 केक बेक केले. त्या सर्व 30 केक्सची पहिली चव तू चाखली होतीस, पण हा… 30 वाढदिवस आधीच साजरे करण्याची ही तुझी पद्धत होती का? आपल्या प्रियजनांसाठी तू बरेच प्रश्न अनुत्तरीत सोडले आहेस” असं मयुरीने या पोस्टखाली लिहिले आहे.
हेदेखील वाचा- 'खुलता खळी खुलेना' फेम अभिनेत्री मयुरी देशमुखचा पती आशुतोष भाकरे ची गळफास लावून आत्महत्या
आम्हाला माहित आहे की तू उचललेले पाऊल भ्याडपणातून नाही, तर असहाय्यतेमुळेच होते, जे नैराश्यासोबत झालेल्या तुझ्या दीर्घकालीन संघर्षातून आले. पण गुणी बाळ माझं ते, आपण त्याला पराभूत करण्याच्या अगदी जवळ आलो होतो आणि तू असे वेड्यासारखे कृत्य केलेस. थोडं आणखी थांबायची आवश्यकता होती.”दररोज, प्रत्येक सेकंदाला, थोडासा जास्तीचा संयम, थोडेसे अधिक धैर्य आणि एक दीर्घ, निरोगी, आनंदी आयुष्य वाट पाहत होतं तुझी असही तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
इतक्या वेदना असूनही तू माझ्यावर खूप प्रेम केले आहेस, मीही तेच करत राहीन. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असं सांगत तिने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
