'खुलता खळी खुलेना' फेम अभिनेत्री मयुरी देशमुखचा पती आशुतोष भाकरे ची गळफास लावून आत्महत्या
Mayuri Deshmukh, Ashutosh Bhakre (PC- Instagram)

'खुलता खळी खुलेना' (Khulta Khali Khulena) फेम अभिनेत्री मयुरी देशमुखचा पती आशुतोष भाकरे (Ashutosh Bhakre) याने नांदेडमध्ये राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या (Suicide) केली आहे. आशुतोषच्या आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. या धक्कादायक घटनेमुळे मयुरी देशमुखच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला असून मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

दरम्यान, आशुतोषने फेसबुरवर काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओतील व्यक्ती माणूस आत्महत्या का करतो? याबाबत विश्लेषण करत होता. परंतु, तरीही आशुतोषने आत्महत्या सारखे टोकाचे पावून का उचलले? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. (हेही वाचा - बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयच्या चित्रपटातून श्वेता तिवारी ची मुलगी पलक तिवारी करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण)

मयुरीने ‘डिअर आजो’ हे लोकप्रिय नाटक लिहिलेले तसेच दिग्दर्शित केले आहे. दरम्यान, आशुतोषदेखील एक उत्तम अभिनेता होता. त्याने ‘भाकर’, ‘इच्यार ठरला पक्का’ या चित्रपटात काम केलं आहे. आशुतोष आणि मयुरी यांचा विवाह 21 जानेवारी 2016 रोजी झाला होता. आशुतोषच्या आत्महत्येमुळे मयुरीला मोठा धक्का बसला आहे.