बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयच्या चित्रपटातून श्वेता तिवारी ची मुलगी पलक तिवारी करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण
Rosie: The Saffron Chapter Poster (PC - Twitter)

सध्या अनेक स्टारकिड्स बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. अभिनेता विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) च्या आगामी चित्रपटातून श्वेता तिवारी (Shweta Tiwari’s) ची मुलगी पलक तिवारी (Palak Tiwari) बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. विवेक ओबेरॉयने ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये विवेकने म्हटलं आहे की, ‘ही माझी मिस्ट्री गर्ल. आम्हाला पलक तिवारीला रोझी या रोलमध्ये लाँच करताना आनंद होत आहे. आमचा हा हॉरर थ्रिलर फ्रेंचायजीमधील चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहे.’

‘रोझी: द सफरॉन चॅप्टर’ (Rosie: The Saffron Chapter) असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल मिश्रा करणार आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाची निर्मिती विवेक ओबेरॉय करत आहेत. (हेही वाचा - सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्ती विरोधात FIR दाखल झाल्यानंतर एक्स-गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिने सोशल मीडियावर केली 'ही' पोस्ट (View Post))

दरम्यान, ‘रोझी: द सफरॉन चॅप्टर’ या चित्रपटात पलक मुख्य भूमिकेत दिसणार आहे. विवेक ओबेरॉयने ट्विटवर या चित्रपटाचं पोस्टर लाँच केले आहे. पलक तिवारीदेखील आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून 'रोझी' चित्रपटाचे पोस्टर लाँच करताना म्हटलं आहे की, 'बॉलीवूडमध्ये पदार्पणाची बातमी रोझी चित्रपटाद्वारे शेअर करताना मी खूप उत्साही आहे. हे माझ्या चित्रपटाचे पहिले पोस्टर आहे'.