मराठी मालिकांमध्ये टीआरपीवरुन कायमच चढ उतार बघायला मिळतो. झी मराठी, कलर्स मराठी आणि स्टार प्रवाह या तीन वाहिन्यावरील मालिकेंमध्ये दर आठवड्यात टीआरपीबाबत काटझाट बघायला मिळते. स्टार प्रवाह वरील बहूर्चित आई कुठे काय करते या मालिकेने बराच काळ पहिला क्रमांक पटकावला असला तरी तुझेचं गीत मी गात आहे ही मालिका टीआरपी मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. नव्याने सुरु झालेल्या या मालिकेचा छोट्या पडद्यावर चांगलाच बोलबाला बघायला मिळत आहे. तरी अभिनेता अभिजीत खांडकेकर आणि प्रिया मराठे या मालिकेत प्रमुख भुमिकेत आहेत. जाणून घेवूया टीआरपी लिस्टमध्ये कुठली मालिका कुठल्या क्रमांकावर आहे.
टीआरपीच्या शर्यतीत स्टार प्रवाह वरील 'तुझेच मी गीत गात आहे' ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.9 रेटिंग मिळाले आहे.'रंग माझा वेगळा' ही मालिका टीआरपी रेसमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.8 रेटिंग मिळाले आहे.'आई कुठे काय करते' या मालिकेने 6.5 रेटिंग पटकावत तिसरा क्रमांक मिळवला आहे.'फुलाला सुगंध मातीचा' ही मालिका टीआरपी रिपोर्टनुसार चौथ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.3 रेटिंग मिळाले आहे.'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पाचव्या स्थानावर आहे. टीआरपी रिपोर्टनुसार या मालिकेला 6.2 रेटिंग मिळाले आहे.'आता होऊ दे धिंगाणा' ही मालिका सहाव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 5.9 रेटिंग मिळाले आहे. (हे ही वाचा:- Abhinay Berde Video: एक काळ होता जेव्हा लक्ष्मीकांत बेर्डेंचा तो अभिनय अख्या महाराष्ट्राने लक्षात ठेवला होता, तुमचा हा अभिनय उद्याही महाराष्ट्र लक्षात ठेवेल; अभिनेता अभिनय बेर्डेचं वडीलांना अनोख प्रॉमीस)
तर टीआरपीच्या शर्यतीत 'ठिपक्यांची रांगोळी' ही मालिका सातव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 5.7 रेटिंग मिळाले आहे.'सहकुटुंब सहपरिवार' ही मालिका टीआरपी रिपोर्टमध्ये आठव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 5.1 रेटिंग मिळाले आहे.नव्या स्थानावर 'स्वाभीमान' ही मालिका आहे. या मालिकेला 4.8 रेटिंग मिळाले आहे.'अबोली' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत दहाव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 4.1 रेटिंग मिळाले आहे.तरी आणखी नवनव्या मालिका लवकरच प्रदर्शित होणार आहेत. उद्यापासून कल्रस मराठीवर बीग बॉस मराठी हा रिअॅलिटी शो सुरु होणार आहे. बीग बॉस मराठीचं हे चौथं सिझन असून दरवर्षी प्रमाणे महेश मांजरेकरचं हा शो होस्ट करणार आहे.