Man vs Wild: आज घडणार नरेंद्र मोदी यांच्या साहसाचे दर्शन; मराठीमध्येही 'इथे' पाहू शकाल Discovery चा खास एपिसोड
Man vs Wild With Bear Grylls and Narendra Modi (Photo Credits: ANI)

'मॅन व्हर्सेस वाइल्ड' (Man vs Wild) च्या एका विशेष मालिकेत बियर ग्रिल्स (Bear Grylls) आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) एकत्र दिसणार आहेत. हा भाग आज रात्री डिस्कवरी चॅनेलवर (Discovery Channel) प्रसारित होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बियर ग्रिल्स उत्तराखंडच्या जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये त्यांच्या रोमांचक प्रवासाला सुरुवात करतील. जिथे दोघांमधील साहस, जंगलातील एक अद्भुत सफर यांसह इतरही अनेक गोष्टी असतील. भारतीय लोक या भागाची फार काळापासून प्रतीक्षा करत होते. तुमच्याकडे टीव्ही नसला तरी मोबाईलवर तुम्ही हा शो पाहू शकणार आहात.

हा शो डिस्कवरी इंडियावर पाहता येईल. डिस्कवरी हा शो जगातील 180 देशांमध्ये प्रसारित करेल. भारताचे पंतप्रधान या शोमध्ये पहिल्यांदा दिसणार आहेत. यापूर्वी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा दिसले होते. या भागात पंतप्रधान धोकादायक जंगलांमध्ये आपल्या साहसाचे दर्शन घडवतील. प्राण्यांचे संरक्षण आणि पर्यावरणीय बदलांविषयी जनजागृती करण्यासाठी पंतप्रधानांनी या एपिसोडसाठी होकार दिला होता.

12 ऑगस्ट म्हण आज आज रात्री ठीक 9 वाजता हा एपिसोड प्रसारित होईल. इंग्रजी, हिंदी, बंगाली, तामिळ, तेलुगू, कन्नड, मराठी, मल्याळम अशा आठ भाषांमध्ये हा कार्यक्रम पाहता येणार आहे. हा कार्यक्रम एकाच वेळी डिस्कव्हरीच्या 12 वाहिन्यांवर दाखवण्यात येणार आहे. डिस्कव्हरी, एचडी वर्ल्ड, ऍनिमल प्लॅनेट, ऍनिमल प्लॅनेट एचडी वर्ल्ड, टीएलसी, टीएलसी एचडी वर्ल्ड, जीत, जीत प्राईम एचडी, डिस्कव्हरी सायन्स, डिस्कव्हरी टर्बो, डिस्कव्हरी किड्स अशा या वाहिन्या आहेत. (हेही वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुरक्षिततेसाठी वाघाला मारण्याची सांगितली ट्रीक, बेयर ग्रिल्स याला मिळाले असे उत्तर)

नेटफ्लिक्स आणि पीएमओच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुनही हा भाग प्रसारित होणार आहे. पण याबाबतची वेळ आणि तारीख अजून गुदास्त्यात ठेवली आहे.