Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतून ‘हा’ अभिनेता घेणार ब्रेक, कारण ऐकुन बसेल आश्चर्याचा धक्का
Shreyas Talpade and Pari (Photo Credits-Instagram)

झी मराठीवरील (Zee Marathi) सुप्रसिद्ध मालिका ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Majhi Tujhi Reshimgath) या मालिकेला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळताना दिसत आहे. यश आणि नेहाच्या लग्ननानंतर मालिकेच्या चाहत्यांची संख्या आणखी वाढत आहे. पण मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असताना मलिकेतील एक महत्वाचा अभिनेता मालिकतून ब्रेक घेणार आहे.

आनंद काळे (Aanand Kale) म्हणजेच यशचे विश्वजीत काका मालिकेतून 21 दिवसांसाठी ब्रेक घेणार आहेत. आनंद काळे हा ब्रेक घेण्यामागचं कारण ऐकून तुम्हाला आश्यचर्याचा धक्का बसू शकतो. आनंद काळे बाईकवरुन ‘कोल्हापूर (Kolhapur) ते कश्मीर (Kashmir) लेह (Leh) लडाख (Ladakh)’ अशी सफर करणार आहेत. त्यामुळेच त्यांनी मालिकेतून ब्रेक घेतला आहे. आनंद काळे यांनी यासंदर्भात माहिती त्यांच्या इंस्टाग्राम (Instagram) पेजच्या माध्यमातून दिली आहे. (हे ही वाचा :- Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेचे 3500 एपिसोड पूर्ण, टीम कडून अनोख्या पध्दतीने सिलीब्रेशन)

 

View this post on Instagram

 

A post shared by Anand Kale Andy (@aanandkale)

'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिकेला प्रेक्षकांची जोरदार पसंती आहे. या मालिकेत श्रेयस तळपदे (Shreayas Talpade), प्रार्थना बेहेरे (Prarthna Behre) मुख्य भूमिकेत आहेत. आता मालिकेत यश (Yash) आणि नेहाचा (Neha) संसार खुलू लागलेला पाहायला मिळत आहे. अशातच मालिकेतील विश्वजित काका 21 दिवसांसाठी मालिकेतून ब्रेक घेणार आहेत. मालिकेतील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांच्या कौतुकास पात्र ठरतो आहे. मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. या लोकप्रियतचं कारण आहे मालिकेत बालकलाकार म्हणून झळकणारी इवलीशी परी (Pari) म्हणजे मायरा वैकुल (mayra vaikul). मायराने आपल्या अभिनयाने सगळ्यांना भुरळ घातली आहे.