Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेचे 3500 एपिसोड पूर्ण, टीम कडून अनोख्या पध्दतीने सिलीब्रेशन
दयाबेन-जेठालाल (Photo Credit : Instagram)

बहुचर्चित मालिका तारक मेहता का उल्टा चष्माच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. मालिकेन एकूण 3500 एपिसोड पूर्ण करत TMKOC टीमकडून जोरदार सेलीब्रेशन करण्यात आलं. बहु-सांस्कृतिक कॉस्मोपॉलिटन आणि सर्वधर्मसमभाव असणाऱ्या गोकुलधामच्या रहिवाशाचं अनोख सिलिब्रेशन बघायला मिळालं. संपूर्ण स्टार कास्ट, असित कुमार मोदी, लेखक, दिग्दर्शक आणि क्रू यासह केक कापून विशेष सेलिब्रेशन करण्यात आलं. तर असित कुमार मोदींनी या यशाचं श्रेय प्रेक्षकांना देत संपूर्ण प्रेक्षकांचे विशेष आभार मानले.  तारक मेहता का उल्टा चष्माच्या टीमकडून त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर काही विशेष फोटो शेअर करण्यात आले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tmkoc vibes 😀 (@tmkoc_vibes._)

तारक मेहता का उल्टा चष्मा ही सर्वात जास्त काळ चालणारी सिटकॉम आहे. मालिकेचा पहिला भाग 2008 मध्ये पहिल्यांदा प्रसारित झाला होता. म्हणजेच मालिकेने आता 14 व्या वर्ष पूर्ण केली असुन TMKOC ही भारतातील सर्वात लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. मालिकेने 3500 भागांचा टप्पा गाठला असला तरी हिंदी व्यतिरीक्त ही मालिका मराठी आणि तेलगु या दोन भाषांमध्ये प्रसारीत होते.

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका देशातील सर्वात लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या शोमधील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या आवडीचं आहे. कोरोना महामारी दरम्यान अनेक प्रसिद्ध कलाकारांनी मालिका सोडली. पण सर्व प्रकारच्या चढ-उतारांना तोंड देत या शोने साडेतीन हजार भाग पूर्ण केले आहेत.