कलर्स मराठी वाहिनीवरील सध्या बरीच चर्चेत असलेली मालिका म्हणजे 'जीव झाला येडापिसा' (Jeev Zala YedaPisa ). या मालिकेतील शिवा-सिद्धी (Shiva-Siddhi) या गोड जोडीला अगदी लहानग्यांपासून ते मोठ्यांनी डोक्यावर घेतलय. ही मालिका बरीच रंजक वळणे घेत असून आज या मालिकेतील एक महत्त्वाचा एपिसोड प्रदर्शित होणार आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून प्रेक्षक या मालिकेमधील ज्या सूरमारी स्पर्धेची वाट पाहत होते त्या स्पर्धेचा रंजक टप्पा आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. या मालिकेत आज सिद्धी शिवाचे रक्षण करण्यासाठी पाण्यात उडी मारणार आहे. हा एपिसोड पाहायला जितका सोपा वाटतोय त्याच्यापेक्षा कितीतरी पटींनी जास्त मेहनत या कलाकारांनी घेतली आहे. हा सीन करताना शिवा आणि सिद्धी तब्बल 10 तास पाण्याखाली राहून हा सीन पूर्ण केला आहे.
या मालिकेचे जे कथानक आहे त्या कथानकाभोवती सूरमारी या खेळाचे आणि त्या भोवती घडणा-या घटनांचे खूप महत्व आहे असे या मालिकेचे लेखक चिन्मय मांडलेकर यांनी मेकिंगमध्ये सांगितले आहे. हा चित्तथरारक सीन पाहा एक झलक:
हेदेखील वाचा- अग्गंबाई..सासूबाई या मालिकेमधील मधील 'मॅडी' आहे हिंदी आणि मराठी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्याची बायको
मराठी टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच असा धाडसी प्रयत्न आपल्याला आज पाहायला मिळणार आहे. या सीनसाठी या दोघांनी 8 ते 10 तास पाण्याखाली राहून शूट केले आहे. तसेच या मालिकेची प्रमुख भूमिका साकारणारी सिद्धी ही राज्यस्तरीय जलतरणपटू असून तिने हा सीन करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. इतकच नव्हे तर हा सीन तिने मराठमोळ्या नऊवारी साडीत केला आहे.