Kaun Banega Crorepati: जसकरण सिंह बनले KBC-15 चे पहिले करोडपती; बिग बींनी 7 कोटींसाठी विचारला 'हा' प्रश्न
Jaskaran Singh Win 1 Crore In KBC (PC - Instagram)

Jaskaran Singh Win 1 Crore In KBC: अमिताभ बच्चन सध्या 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati) चा 15वा सीझन होस्ट करत आहेत. कौन बनेगा करोडपती 15व्या सीझनला पहिला करोडपती मिळाला आहे. सीझन 15 चा करोडपती बनणारा पहिला व्यक्ती पंजाबचा आहे. होय, पंजाबच्या जसकरण सिंग (Jaskaran Singh) ने कौन बनेगा करोडपतीमध्ये एक कोटी रुपये जिंकले आहेत. जसकरण सिंहने शोमध्ये सांगितले की तो तरनतारनच्या खलरा गावचा आहे. त्याच्या गावातील फार कमी लोक पदवीधर झाले आहेत आणि तो त्यापैकी एक आहे. तो अभ्यासासाठी गावापासून चार तासांचा प्रवास करतो. तो नागरी सेवांसाठी तयारी करत आहे.

जसकरणने सांगितले की पुढील वर्षी आयएससाठी त्याचा पहिला प्रयत्न असेल. कौन बनेगा करोडपतीमध्ये जिंकलेली रक्कम ही त्याची आजपर्यंतची पहिली कमाई असल्याचे त्याने सांगितले. जसकरणने शो दरम्यान सांगितले की, शोमध्ये एक कोटी जिंकल्यानंतर बिग बींनी पुढील 7 कोटींचा प्रश्नही विचारला. जो तुम्ही खालील व्हिडिओमध्ये पाहू शकता. (हेही वाचा - Tiger 3 First Poster Out: सलमान खान आणि कतरिना कैफच्या 'टायगर 3' चे फर्स्ट लूक पोस्टर रिलीज; 'या' दिवशी रिलीज होणार चित्रपट)

इन्स्टाग्रामवर प्रोमो व्हिडिओ शेअर करताना सोनी टीव्हीने लिहिले की, प्रत्येक अडचणीवर मात करत पंजाबमधील खलरा या छोट्या गावातील जसकरण सिंह ₹ 7 कोटींच्या सर्वात मोठ्या प्रश्नांपर्यंत पोहोचले आहेत.