Tiger 3 First Poster (PC - Instagram)

Tiger 3 First Poster Out: यशराज बॅनरच्या स्पाय थ्रिलर 'टायगर' फ्रँचायझी म्हणजेच 'टायगर 3'च्या तिसऱ्या भागाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. सलमान खान (Salman Khan) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif') च्या आगामी 'टायगर 3' बद्दल चाहते खूप उत्सुक आहेत. दरम्यान, शनिवारी 'टायगर 3' चे फर्स्ट लूक पोस्टर समोर आल्याने चाहत्यांच्या उत्सुकता अधिक वाढली आहे. सलमान खानने सोशल मीडियावर टायगर 3 चे फस्ट लूक पोस्टर शेअर केले आहे.

सलमान खानने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर 'टायगर 3' चे फर्स्ट लूक पोस्टर शेअर केले. हे धमाकेदार पोस्टर शेअर करत भाईजानने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "येत आहे, टायगर 3 या दिवाळी 2023 ला प्रदर्शित होईल." तुमच्या जवळच्या सिनेमागृहांमध्ये टायगर-3 चा उत्साह साजरा करा. यासोबतच टायगर हा यशराजच्या मागील स्पाय थ्रिलर 'वॉर' आणि 'पठाण' सारखा पॅन इंडिया चित्रपट असेल अशी माहितीही सलमानने दिली आहे. सलमान खान आणि कतरिना कैफचा 'टायगर 3' हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये रिलीज होणार आहे. (हेही वाचा - Kaala Trailer: भूषण कुमार 'काला 'सीरीजमधून डिजिटलमध्ये करणार पदार्पण,सीरिज १५ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला)

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

या चित्रपटाबद्दल चाहत्यांना खूप उत्सुकता आहे, हे देखील स्वाभाविक आहे कारण 'टायगर जिंदा है' च्या प्रचंड यशानंतर सलमान आणि कतरिना 6 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर परत येत आहेत. चाहते टायगर आणि झोयाच्या कथेच्या या तिसऱ्या अध्यायासाठी उत्सुक आहेत. टायगर फ्रँचायझीचे मागील दोन भाग, एक था टायगर (2012) आणि टायगर जिंदा है (2017) बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरले आहेत.