Taarak Mehta Ka Ooltah Chashmah मध्ये अभिनेत्री Disha Vakani पुन्हा Dayaben च्या भूमिकेत कमबॅक करणार?
Disha Vakani As Dayaben in Taarak Mehta Ka Ooltah Chashmah (Photo Credits: Twitter)

तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील आयकॉनिक पात्र 'दयाबेन'. मागील चार वर्ष दयाबेन मालिकेतून गायब आहे. हे पात्र अभिनेत्री Disha Vakani ने एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं होतं. मागील 4 वर्षात Disha Vakani ला मालिकेत पुन्हा आणण्यासाठी परयत्न सुरू होते. मात्र आता दया जेठालाल गडा या पात्रात दिशा पुन्हा दिसू शकते असा बातम्या समोर आल्या आहेत. 2017 पासून maternity leave वर असलेली अभिनेत्री मालिकेत पुन्हा एंट्री करण्याची शक्यता आहे.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah च्या इंस्टाग्रामवरील एका फॅनपेज वर दिशाचा ऑन स्क्रिन आणि ऑफ स्क्रिन भाऊ Mayur Vakani अर्थात सुंदरलाल याने ही माहिती कंफर्म केल्याचं सांगण्यात आलं आहे. या दिवाळीपासून पुन्हा दयाबेनच्या भूमिकेत दिशा दिसू शकते असं यामध्ये सांगण्यात आलं आहे. असं वृत्त झी मीडीयाने दिलं आहे.

पहा पोस्ट

तारक मेहताच्या टीम कडून आता दयाबेनच्या भूमिकेत खरंच दिशाला पुन्हा आणण्यामध्ये प्रोडक्शन यशस्वी ठरलं आहे की नवी अभिनेत्री आता दयाबेन म्हणून रसिकांच्या समोर येणार? याचं उत्तर येत्या काही दिवसांत समजणार आहे.

हिंदी टेलिव्हिजन वर तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका गेली 15 वर्ष चालली आहे. या मालिकेने लोकप्रियतेमध्ये अनेक चढ उतार पाहिले आहेत. काही कलाकारांनी ही मालिका अर्ध्यावरच सोडली आहे. काही कलाकारांनी निर्मात्यांवर गंभीर आरोप केल्यानेही ही मालिका मागील काही दिवस चर्चेमध्ये आली होती.