Web Series On Gangster Vikas Dubey: प्रसिद्ध चित्रपट निर्माते हंसल मेहता करणार गँगस्टर विकास दुबे च्या जीवनावर आधारित वेब सीरिजचं दिग्दर्शन
Gangster Vikas Dubey, Hansal Mehta (PC - Twitter/ANI)

Web Series On Gangster Vikas Dubey: कानपूर पोलीस हत्याकांडातील मुख्य आरोपी गँगस्टर विकास दुबे (Gangster Vikas Dubey) पोलीस चकमकीत मारला गेला. एखाद्या चित्रपटात सीनप्रमाणे त्याचं एन्काऊंटर करण्यात आलं. विकास दुबे हा कानपूर चकमकीत 8 पोलिसांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला होता. विशेष म्हणजे आता लवकरचं विकास दुबे याच्या जीवनावर आधारित वेब सीरिज (Web Series) येणार आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते हंसल मेहता (Hansal Mehta) या वेब सीरीजचं दिग्दर्शन करणार आहेत.

विकास दुबे याच्या जीवनावर आधारित वेब सीरिज तयार करण्यासाठी निर्माता शैलेश आर. सिंग यांच्या कर्मा मीडिया आणि एंटरटेनमेंटने पोलॉरॉईड मीडियाने या वेब सीरिजचे हक्क विकत घेतले आहेत. त्यामुळे प्रेक्षक ही वेबसीरिज पाहण्यास उत्सुक असणार आहे. या वेब सीरिजच्या माध्यमातून गँगस्टर विकास दुबेच्या जीवनाचा उलगडा होणार आहे. (हेही वाचा - बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन शोधत आहेत दुसरा जॉब; कारण घ्या जाणून)

दरम्यान, कानपूर पोलीस हत्याकांडातील आरोपी विकास दुबे याला जुलै महिन्यात मध्य प्रदेशातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला कानपूरला घेऊन जात असताना पोलिसांच्या ताफ्यातील एका वाहनाचा अपघात झाला. त्यानंतर विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. तसेच विकास दुबेने पोलिसांकडील पिस्तुल हिसकावून गोळीबार करण्यास सुरूवात केली होती. त्यामुळे या चकमकीत विकास दुबे ठार झाला होता. (हेही वाचा - Vikas Dubey Arrested: कानपूर एन्काऊंटर प्रकरणातील कुख्यात गुंड विकास दुबे याला उज्जैन मधून अटक)

या वेब सीरिजसंदर्भात बोलताना हंसल मेहता यांनी सांगितलं की, विकास दुबे याच्या जीवनावर आधारित वेब सीरिज ही एक राजकीय थ्रिलर असणार आहे. त्यामुळे ही कहाणी वेब सीरिजच्या माध्यमातून दाखवण अधिक रंजक ठरणार आहे.