विकास दुबे अटक । Photo Credits: Twitter/ ANI

कानपूर मध्ये 8 पोलिसांची हत्या करण्याचा आरोप असलेला कुख्यात गुंड विकास दुबे (Vikas Dubey) याला बेड्या ठोकण्यात यश आलं आहे. ANI ट्वीटच्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश सरकारच्या सुत्रांच्या माहितीनुसार मध्य प्रदेशच्या उज्जेन मध्ये विकास दुबे याला अटक करण्यात आली आहे. देशात लॉकडाऊन असताना त्याने सीमा पार कशा केल्या? हा प्रश्न देखील आता उपस्थित झाला आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी फरिदाबाद येथील एका मिठाईच्या दुकानासमोरच्या फुटपाथवर विकास दुबे उभा असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले होते. या ठिकाणाहून रिक्षाने तो पुढे कुठे गेला हे मात्र समजू शकले नाही. उत्तर प्रदेश पोलिसांनी त्याचा ठावठिकाणा सांगणार्‍याला 5 लाख रुपयांचे इनाम जाहीर केले होते.  (हेही वाचा, Kanpur Encounter: कुख्यात गँगस्टर विकास दुबे याची पतनी ऋचाही आता 'मोस्ट वॉन्टेड').

ANI Tweet

दरम्यान विकास दुबे याला उज्जैन येथील महाकाल मंदिर परिसरातून अटक झाली आहे. या अटकेची अधिकृत घोषणा अद्याप बाकी आहे.

Vikas Dubey Arrested: कानपूर एन्काऊंटर प्रकरणातील कुख्यात गुंड विकास दुबे याला उज्जैन मधून अटक - Watch Video

उत्तर प्रदेश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल 3 जणांना अटक करण्यात आली आहे. यापैकी एक प्रभात मिश्रा होता. त्याने पळून जाण्याचा प्रय्त्न करताच त्याला गोळ्या घालण्यात आला आहे. त्याचा मृत्यू झाला आहे. तर आज सकाळी इटावा पोलिसांसोबत झालेल्या झटापटीमध्ये एका व्यक्तीचा  (बऊआ दुबे) याचा मृत्यू झाला आहे. त्याच्याकडे रायफल, पिस्तुल मिळाली आहे. कानपूर पोलिसांनी त्याची ओळख बऊआ दुबे सांगितली आहे. कानपूर एन्काऊंतर दरम्यान तो विकास दुबे सोबत होता. त्याच्यावर 50 हजारांचे बक्षीस होते. अशी माहिती आकाश तोमर  (SSP, इटावा) यांनी दिली आहे.