बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन शोधत आहेत दुसरा जॉब; कारण घ्या जाणून
Amitabh Bachchan (Photo Credits: IANS)

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी गेल्या काही दिवसांपूर्वीच कोरोनावर मात केली आहे. मुंबई येथील नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर तब्बल 23 दिवस उपचार सुरु होते. दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी कोरोनाबाबत आपली भिती व्यक्ती केली आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून 65 वर्षावरील नागरिकांना याचा अधिक धोका आहे. यामुळे राज्य सरकारने 65 वर्षावरील कलाकारांना चित्रीकरण करण्यास मनाई केली आहे. यामुळे 65 वर्षावरील कलाकारांना कामासाठी आता घराबाहेर पडता येत नाही. मला दुसरे कुठले काम मिळेल का? असा अमिताभ बच्चन यांनी एका ऑनलाईन ब्लॉगच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.

अभिताभ बच्चन हे नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असतात. तसेच ट्विटर, इंस्टाग्राम, माध्यमातून ते कायम आपले विचार अनेकांसमोर मांडत असतात. यातच कोरोनावर मात करून घरी परतल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी एक महत्वाचा ब्लॉग लिहला आहे. "सध्या सर्वच जण करोनामुळे त्रस्त आहेत. सरकार, डॉक्टर्स, वैद्यकिय तज्ज्ञ आपापल्या परीने करोनावर मात करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण ही परिस्थिती माझ्यासारख्या 65 वर्षांवरील मंडळींसाठी अत्यंत भीतीदायक आहे. आम्ही आता मुक्तपणे बाहेर फिरु शकत नाही. कोर्टाने 65 वर्षांवरील कलाकारांना शूटिंगसाठी परवानगी दिली खरी, पण ते स्वातंत्र्य अनुभवता येत नाही. मनात कायम भीती राहाते. माझ्यासाठी दुसरा कुठला जॉब असेल तर मला सांगा", असा चकित करणारा ब्लॉग त्यांनी लिहला आहे. हे देखील वाचा-Sushant Singh Rajput Death Case: अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने सुशांत सिंह राजपूत याच्याबरोबर झालेल्या व्हॉट्सअप संवादाचे स्क्रीनशॉर्ट केले शेअर; पाहा फोटो

अमिताभ बच्चन यांच्यासह अभिषेक बच्चनलाही कोरोना संसर्ग झाला होता. मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. अखेर अभिषेकने अखेर त्याची कोरोना चाचणी निगेटीव्ह आल्याने त्यालाही डिस्चार्ज देण्यात आला आहे. तब्बल 28 दिवस त्याच्यावर उपचार सुरु होते.