Sushant Singh Rajput Death Case: अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने सुशांत सिंह राजपूत याच्याबरोबर झालेल्या व्हॉट्सअप संवादाचे स्क्रीनशॉर्ट केले शेअर
Sushant Singh Rajput and Rhea Chakraborty (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरण (Sushant Singh Rajput Case) दररोज नवीन वळण घेऊ लागले आहे. यातच सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीने (Rhea Chakraborty) सुशांतबरोबर झालेल्या संवादाचे स्क्रीनशॉर्ट शेअर केले आहेत. ज्यात सुशांत आपल्या बहिण प्रियंकाकडून रियाला मिळणाऱ्वागणूकीसंदर्भात बोलत आहे. रिया चक्रवर्ती हिनेच सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत केल्याचा आरोप केला होता. त्यानंतरच रियाने हे स्क्रीनशॉर्ट इंडिया टुडेबरोबर शेअर केले आहेत. तसेच सुशांतच्या वडिलांनी रियाच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार, रियाची गेल्या अनेक दिवसांपासून कसून चौकशी केली जात आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने 14 जून रोजी त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरी आत्महत्या केली. या घटनेमुळे सगळं बॉलिवूड हादरले होते. मात्र, या घटनेनंतर सुशांतचा मृत्यू हा सिनेसृष्टीतली गटबाजी आणि घराणेशाही यामुळे झाला असाही एक आरोप झाला. या संदर्भातल्या बातम्या समोर आल्यानंतर या प्रकरणात महाराष्ट्राच्या गृह खात्याने लक्ष घातले आणि पोलिसांनी हा अँगल तपासून पाहण्यासाठी आत्तापर्यंत 40 जणांची चौकशी केली आहे. दरम्यान हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले आहे. सीबीआयच्या आरोपपत्रात सुशांतची जवळची मैत्रीण रिया चक्रवर्तीचं नाव आहे. तिची या प्रकरणात शनिवारी चौकशी करण्यात आली. दरम्यान या सगळ्या प्रकरणात रियाला वाचवण्याचा प्रयत्न केला जातो आहे असा, आरोप आता सुशांतच्या वडिलांनी केला आहे. हे देखील वाचा-दिशा सलियन हिचा मृतदेह नग्न अवस्थेत आढल्याची बातमी चुकीची, पोलिसांनी दिले 'हे' स्पष्टीकरण

तसेच रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्ती याची ईडीकडून तब्बल 18 तास चौकशी करण्यात आली आहे. शनिवारी दुपारपासून रविवारी सकाळी साडे सहा वाजेपर्यंत त्याची चौकशी सुरु होती. त्यानंतर त्याला ईडी कार्यालयातून बाहेर पाठवण्यात आले आहे.