दिशा सलियन हिचा मृतदेह नग्न अवस्थेत आढल्याची बातमी चुकीची, पोलिसांनी दिले 'हे' स्पष्टीकरण
Disha Salian (Photo Credits-Twitter)

बॉलिवूड मधील सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सलियन (Disha Salian) हिच्या मृत्यूच्या घटनेमुळे खळबळ उडाली होती. तिचा मृतदेह मुंबईतील मालाड स्थित असलेल्या एका इंच इमारतीच्या येथे आढळला होता. याच दरम्यान, दिशा ही इमारतीच्या 14 व्या मजल्यावरुन खाली पडल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. पण दिशा सलियन हिचा मृतदेह नग्न अवस्थेत आढळून आल्याची बातमी खोटी असल्याची माहिती डीसीपी झोन-11 च्या विशाल ठाकूर यांनी दिली आहे. त्याचसोबत ज्या वेळी दिशा सलियनच्या मृत्यूची घटना कळली त्यावेळी पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले होते. त्याचसोबत पंचनामा सुद्धा करण्यात आला होता. ऐवढेच नाही तर दिशा हिच्या परिवारातील मंडळी सुद्धा घटनास्थळी दाखल झाली होती.

दिशा हिचा मृत्यू होण्यापूर्वी तिने तिची मैत्रिण अंकिता हिला फोन केला होता. तर अंकिता हिचा पोलिसांनी जबाब नोंदवला आहे. तसेच 20-25 जणांनी या प्रकरणी आपला जबाब नोंदवला आहे. याच दरम्यान आता दिशा एक जुना व्हिडिओ समोर आला असून त्यात ती पार्टी करत असल्याचे दिसून आले आहे. त्यावेळी तिने खुप ड्रिंक घेतल्याचे तिच्या जवळच्या मित्राने सांगितले असे इंडिया टुडे यांनी म्हटले आहे. तसेच पार्टीवेळी दिशा खुप भावूक होण्यास वारंवार माझी कोणीच पर्वा करत नाही असे म्हणत होती. त्यानंतर दिशाने स्वत:च्या खोलीत जाऊन तिला बंद करुन घेतले. परंतु मित्रांनी दरवाचा ठोठावला असता आतमधून काहीच आवाज आला नाही. अखेर नवऱ्याने धक्का देऊन दरवाजा उघडला असता तिने इमारतीवरुन उडी मारत आत्महत्या केल्याचे समोर आले होते.(सुशांत सिंह राजपूत आणि वरुण शर्मा यांची माजी मॅनेजर दिशा सलियन हिचा इमारतीवरुन पडून मृत्यू, पोलिसांकडून तपास सुरु)

याच दरम्यान, दिशा हिच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी सुशांत सिंह राजपूत याने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. तर सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी रोज नव्या गोष्टी समोर येत आहेत. तसेच ज्या वेळी सुशांतच्या मृत्येचे प्रकरणाचा जेव्हा शोध लागेल त्यानंतर दिशा सलियन बद्दल सुद्धा काही गोष्टी समोर येऊ शकते अशी आता सर्वत्र चर्चा सुरु आहे.