सुशांत सिंह राजपूत आणि वरुण शर्मा यांची माजी मॅनेजर दिशा सलियन हिचा इमारतीवरुन पडून मृत्यू, पोलिसांकडून तपास सुरु
दिशा सलियन हिचा मृत्यू (Photo Credits-Instagram)

चित्रपट सृष्टीसाठी 2020 हे वर्ष अगदीच धक्कादायक आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून चित्रपट सृष्टीतील लोकांचे निधन होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यातच आता अजून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सेलिब्रेटी मॅनेजर हिच्या मृत्यूची घटना उघडकीस आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सलियन(Disha Salian) हिचा इमारतीवरुन पडून मृत्यू झाला आहे. खरंतर दिशा सलियन हिचा मृतदेह मुंबईतील मालाड परिसरातील एका उंच इमारतीच्या येथे मिळाला आहे. असे सांगितले जात आहे की, दिशा इमारतीच्या 14 व्या मजल्यावर खाली पडली. त्यानंतर तिला बोरिवली मधील रुग्णालयात आणले असता तेथे तिला मृत घोषित करण्यात आले.

सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. असे बोलले जात आहे की, दिशा हिचा मृत्यू झाला त्यावेळी घरी तिचा नवरा सुद्धा घरी उपस्थित होता. दिशा हिच्या निधनाची बातमी कळताच वरुण शर्मा याने सोशल मीडियात दु:ख व्यक्त केले आहे. वरुण याने असे लिहिले आहे की, 'Am at a loss of words . Speechless. Numb'(Kannada Actor Chiranjeevi Sarja Passes Away: कन्नड अभिनेता चिरंजीवी सर्जा याचे वयाच्या 39 व्या वयात निधन)

दिशा सलियन हिने काही मॅनेजमेंट आणि पब्लिक रिलेशन कंपन्यांसोबत काम केले आहे. तसेच सुशांत सिंह रजपूर आणि वरुण शर्मा यांच्यासह भारती सिंह सारख्यांचे सुद्धा काम दिशा हिने सांभाळले आहे. त्याचसोबत क्राइम पेट्रोल मध्ये काम करणारी अभिनेत्री प्रेक्षा मेहता हिने सुद्धा स्वत:च्या घरात आत्महत्या केल्याचे प्रकरण समोर आले होते. प्रेक्षा हिच्याबाबत बोलायचे झाल्यास लॉकडाऊनमुळे ती फार त्रस्त होती. त्यामुळेच तिने आत्महत्या करण्याचे पाऊल उचलले होते.