Kannada Actor Chiranjeevi Sarja Passes Away: कन्नड अभिनेता चिरंजीवी सर्जा याचे वयाच्या 39 व्या वयात निधन

कन्नड चित्रपटातील अभिनेता (Kannada actor) चिरंजीवी सर्जा (Chiranjeevi Sarja) याचे वयाच्या 39 व्या वयात निधन झाले आहे. चिरंजीवी याच्या निधनामुळे कन्नड चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.

Kannada Actor Chiranjeevi Sarja Passes Away: कन्नड अभिनेता चिरंजीवी सर्जा याचे वयाच्या 39 व्या वयात निधन
Chiranjeevi Sarja (Photo Credits-ANI)

गेल्या काही दिवसांपासून सिनेमा क्षेत्रातील दिग्गज मंडळी दुनियेला अलविदा करत आहेत. त्यानंतर आता इंडस्ट्री मधील आणखी एक अभिनेता याचे दु:खद निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. कन्नड चित्रपटातील अभिनेता (Kannada actor) चिरंजीवी सर्जा (Chiranjeevi Sarja) याचे वयाच्या 39 व्या वयात निधन झाले आहे. चिरंजीवी याच्या निधनामुळे कन्नड चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.(बॉलिवूड दिवगंत अभिनेता इरफान खान ची पत्नी सुतापा ने इरफान ने लावलेल्या झाडांचा फोटो शेअर करत दिला आठवणींना उजाळा)

रिपोर्ट्सनुसार असे म्हटले जात आहे की, चिरंजीवी सर्जा याला श्वास घेण्यास समस्या येत होती. त्यामुळे त्याला बंगळुरु मधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यावेळी चिरंजीवी याला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर निधन झाले आहे. परंतु डॉक्टरांकडून लवकरच या प्रकरणी अधिक स्पष्टीकरण देणार आहेत.(बॉलिवूड अभिनेता इरफान खान यांच्या निधनानंतर पत्नी सुतापा सिकदर झाली भावूक)

याबाबत चित्रपटाचे जाणकार रमेश बाला यांनी चिरंजीवी सर्जा याच्या निधनाची माहिती दिली आहे. त्यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, कन्नड अभिनेता चिरंजीवी याचे हृयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. हे खरच धक्कादायक आहे की चिरंजीवी अवघा 39 वयाचा होता. अभिनेत्याचा भाऊ ध्रुव सर्जा आणि भाचा अर्जुन सर्जा यांच्या प्रती माझी भावना व्यक्त करत त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

चिरंजीवी सर्जा याने 2009 मध्ये चित्रपट वायुपुत्र मधून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्याने 20 हून अधिक चित्रपटात काम केले आहे. चिरंजीवी हा साऊथचा चित्रपटातील स्टार अर्जुन सर्जा यांचा भाचा आणि अॅक्शन निर्देशक राजकुमार ध्रुव यांचा भाऊ आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jun 07, 2020 06:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).