बॉलिवूड दिवगंत अभिनेता इरफान खान ची पत्नी सुतापा ने इरफान ने लावलेल्या झाडांचा फोटो शेअर करत दिला आठवणींना उजाळा

बॉलिवूड अभिनेता इरफान खानचा (Irrfan Khan) मृत्यू होऊन एक महिन्याचा कालावधी उलटला आहे. परंतु, आजही इरफानचे चाहते आणि त्याचे कुटुंब या धक्क्यातून सावरलेले नाही. इरफानची पत्नी सुतापा (Sutapa Sikdar) आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून इरफानचे विविध फोटो शेअर करत मागील आठवणींना उजाळा देत असते.

बॉलिवूड दिवगंत अभिनेता इरफान खान ची पत्नी सुतापा ने इरफान ने लावलेल्या झाडांचा फोटो शेअर करत दिला आठवणींना उजाळा
Irfan Khan, Sutapa Sikdar (Photo Credits: Twitter)

बॉलिवूड अभिनेता इरफान खानचा (Irrfan Khan) मृत्यू होऊन एक महिन्याचा कालावधी उलटला आहे. परंतु, आजही इरफानचे चाहते आणि त्याचे कुटुंब या धक्क्यातून सावरलेले नाही. इरफानची पत्नी सुतापा (Sutapa Sikdar) आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून इरफानचे विविध फोटो शेअर करत मागील आठवणींना उजाळा देत असते.

मान्सूनचा पहिला पाऊस झाल्यानंतर सुतापाला इरफानची आठवण आली आहे. तिने आपल्या फेसबूक अकाऊंटवरून इरफानने लावलेल्या झाडांचा फोटो शेअर करत भावनिक कॅप्शन दिली आहे. 'आज किती सुंदर भेटवस्तू मिळाली आहे. तू गेल्यानंतरही झाडे असेच बहरतील,' असं म्हटलं आहे. (हेही वाचा - Nora Fatehi Hot Dance: नोरा फतेही चा हा हॉट डान्स पाहून भल्याभल्यांना फुटेल घाम, Watch Video)

दरम्यान, या फोटोमध्ये दिसणारी झाडं इरफानने 2016 मध्ये लावली होती. या फोटोत इरफानने लावलेली झाडं मोठी झालेली पाहायला मिळत आहेत. सुतापाने शेअर केलेल्या या फोटोंना इरफानच्या चाहत्यांनी लाईक तसेच कमेंन्टस् केल्या आहेत. काही चाहत्यांनी इरफान खान नेहमी आपल्या सोबत असेल, मीस यू, हे झाडं आयुष्यभर आपल्या सोबत असतील, आदी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Jun 07, 2020 03:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).